आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराट मुलीसह वृंदावनात पोहोचले:हात जोडून माथा टेकवला, मस्ती करताना दिसली चिमुकली वामिका; VIDEO व्हायरल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली सध्या वृंदावनमध्ये वेळ घालवत आहेत. दोघेही नुकतेच 'बाबा नीम करोली'च्या आश्रमात त्यांच्या मुलीसोबत पोहोचले होते. हे जोडपे श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांना भेटण्यासाठी आले होते. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का आपल्या लाडक्या लेकीसोबत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. यावेळी अनुष्का पांढरा सूट, काळा जॅकेट, पांढरी टोपी, फ्लोरल स्कार्फमध्ये दिसली. तर विराट कोहलीने ऑलिव्ह ग्रीन जॅकेट ब्लॅक कॅप आणि ट्राउझर घातला आहे. व्हिडिओमध्ये चिमुकली वामिका तिची आई अनुष्काच्या मांडीवर बसलेली दिसतेय. त्यानंतर आश्रमातील लोकांनी अनुष्काला ओढणी दिली तर वामिकाच्या गळ्यात हार घातला. व्हिडिओतील वामिकाची मस्ती लक्ष वेधून घेतेय.

वामिकाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूश
पांढऱ्या ड्रेसमध्ये वामिका खूपच क्यूट दिसत आहे. वामिकाचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करताना 'देव या कुटुंबाचे कल्याण करो. वामिका खूप गोंडस आहे.' अनुष्का आणि विराट तब्बल तासभर आश्रमात थांबले होते.

अनुष्का-विराटने केले ब्लँकेटचे वाटप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का-विराटने वृंदावनमध्ये लोकांना ब्लँकेटचे वाटप केले आहे. अनुष्का आणि विराटने आश्रमात ध्यानदेखील केले. दोघांचीही बाबा नीम करोली यांच्यावर अपार श्रद्धा आहे.

नोव्हेंबरमध्येही त्यांनी उत्तराखंडला भेट दिली होती

विराट, अनुष्का आणि त्यांची मुलगी वामिका यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये नैनिताल, उत्तराखंडला भेट दिली होती. यादरम्यान हे जोडपे तेथील प्रसिद्ध मंदिरांमध्ये नतमस्तक होताना दिसले होते. यावेळी त्यांनी कैची धाम मंदिराला भेट दिली. त्यानंतर दोघेही बाबा नीम करोली यांच्या आश्रमात दर्शनासाठी पोहोचले होते. या दौऱ्यात अनुष्का-विराटने चाहत्यांसोबत अनेक फोटोही क्लिक केले होते.

विराट कोहलीने काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो नुकताच बांगलादेश दौऱ्याहून परतला आहे. त्याने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिकाही खेळली होती. तर दुसरीकडे अनुष्काने नुकतेच चकदा एक्स्प्रेस या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. प्रेग्नेंसी लिव्हनंतर आता अनुष्का मोठ्या पडद्यावर कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.

  • कोहली-अनुष्का पोहोचले वृंदावन आश्रमात:बाबा नीम करोलीचे घेतले आशीर्वाद ... ध्यानही केले

भारताचे स्टार जोडपे विरुष्का (विराट कोहली आणि अनुष्का शर्मा) बुधवारी भगवान कृष्णाच्या वृंदावन शहरात होते. तेथे दोघांनी बाबा नीम करोली यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ध्यानही केले. त्यांना प्रसाद म्हणून घोंगडी मिळाली. विराट-अनुष्काने बाल भोगचा प्रसादही खाल्ला. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...