आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शर्मा-विराट कोहली अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस:खरेदी केली 8 एकर जमीन, 19 कोटींमध्ये झाली डील

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या लोकप्रिय कपलने मुंबईतील अलिबागमध्ये 8 एकरची मालमत्ता खरेदी केली आहे. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ही डील फायनल झाली आहे. ही मालमत्ता त्यांनी 19.24 कोटींना विकत घेतल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी ते एक आलिशान फार्महाऊस बांधणार आहेत.

रिअल इस्टेट कंपनीने करुन दिली ही डील
विराट आणि अनुष्काचे हे नवीन फार्महाऊस अलिबागमधील जिराड गावाजवळ बांधले जाणार आहे. विराट सध्या आशिया कप स्पर्धेसाठी दुबईत आहे, त्यामुळे त्याचा भाऊ विकास कोहलीने गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा व्यवहार पूर्ण केला. समीरा हॅबिटॅट्स नावाच्या सुप्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीने हा करार केला आहे.

दाम्पत्याने 3 लाख 35 हजारांचे मुद्रांक शुल्कही जमा केले

विराट आणि अनुष्काने सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी भेट दिली होती. या मालमत्तेचे 3 लाख 35 हजारांचे मुद्रांक शुल्कही त्यांनी जमा केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून या करारावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अलिबागमध्ये इतरही अनेक सेलिब्रिटींची घरे आणि फार्महाऊस आहेत. अलीकडेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने अलिबागमध्ये 5 बीएचके लक्झरी घर खरेदी केले आहे, ज्याची किंमत सुमारे 22 कोटी रुपये आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.

विराटने 5 वर्षांसाठी लीजवर घेतला किशोर कुमार यांचा बंगला
काही दिवसांपूर्वी विराटने दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथील बंगला 5 वर्षांसाठी लीजवर घेतला आहे. तो तिथे रेस्तराँ उघडण्याच्या तयारीत आहेत. रेस्तराँचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे रेस्तराँ पुढील महिन्यापर्यंत सुरू होईल.

900 कोटींहून अधिक आहे विराटची संपत्ती
विराटबद्दल बोलायचे झाले तर जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. सध्या विराट 30 हून अधिक ब्रँड्स एंडोर्स करत आहे. ब्रँड, आयपीएल आणि मॅच फीसह विराट वार्षिक 200 कोटींहून अधिक कमावतो. विराटची एकूण संपत्ती 900 कोटींहून अधिक आहे. याशिवाय विराटने अनेक व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...