आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमधील सेलेब लाइफ:विराटने घरी साजरा केला पत्नी अनुष्काचा वाढदिवस, अनुष्का म्हणाली - नैराश्य दूर होईल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्कानेही तिच्या वाढदिवशी एक कविता इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

1 मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्माने आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनाच्या निमित्ताने तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला, तो अनुष्काला केक भरवताना दिसत आहे. फोटोसह विराटने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- तू माझे प्रेम आहे, जी माझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन आली आणि  दररोज माझे जग प्रकाशमान करीत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.

अनुष्काची बर्थडे विश : तर दुसरीकडे, अनुष्कानेही तिच्या वाढदिवशी एक कविता इंस्टाग्रामवर पोस्ट केली, ज्यात तिने आपल्या वाढदिवशी प्रार्थना केली की, सर्व नैराश्य दूर होईल, सर्व त्रास दूर होतील. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साथीच्या रोगात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांच्या दु:खावर अनुष्काने ही कविता लिहिली आहे. हे सर्व लवकरच संपेल अशी तिने प्रार्थना केली आहे.  बॉलिवूडने 24 तासांच्या आत दोन दिग्गज अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांना कायमचे गमावले, हे दुःखही तिने आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...