आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा 11 जानेवारी रोजी आईबाबा झाले. त्यांच्या घरी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. स्वतः विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. विराटने मुलीच्या जन्मानंतर सोशल मीडियावरदेखील एक बदल केला आहे.
बाळाच्या जन्मानंतर विराटने आपल्या ट्विटवर बायोमध्ये बदल केला आहे. आता विराटने 'a proud husband and father' (अभिमानी पती आणि वडील) असा नवीन बायो लिहिला आहे. तसेच हृदयाचा इमोजीदेखील सोबत जोडला आहे. यापूर्वी त्याच्या बायोमध्ये भारतीय क्रिकेटपटू, फुटबॉल लव्हर, कार लव्हर, उत्साही असा उल्लेख होता.
विराटने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचे सर्वांना सांगितले होते. पहिल्या बाळाच्या जन्मासाठी विराटने ऑस्ट्रेलिया दौ-यातील चार कसोटी सामन्यांची मालिका अर्धवट सोडली होती. त्याने ऑस्ट्रेलिया दौ-यातील फक्त पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर पितृत्वाची रजा घेऊन तो भारतात परतला होता. सध्या विराट अनुष्का आणि बाळासोबत वेळ घालवत आहे. हे सुंदर क्षण गमावण्याची इच्छा नाही, असे त्याने म्हटले होते.
मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका
मुलीच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्का यांनी मीडिया फोटोग्राफर्सना एक नोट लिहित विनंती केली होती. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो फोटोग्राफर्सने काढू नयेत असे म्हटले होते. आपल्या मुलीचा फोटो मीडियात येऊ नये, अशी या दोघांची इच्छा आहे. ‘आई-वडील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले आहे. पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले आहे. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत', असे त्यांनी म्हटले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.