आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021:प्रत्येक पेड पोस्टद्वारे प्रियांका चोप्रा 3 कोटी तर विराट कमावतो 5 कोटी रुपये, यादीत फक्त 2 भारतीयांचा समावेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॉप 30 मध्ये प्रियांका 27 व्या आणि विराट 19 व्या स्थानावर आहे.

इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 मध्ये केवळ 2 भारतीयांना स्थान मिळवता आले आहे. या 2 भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे. Hopperhq.com च्या इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 च्या टॉप 30 आकडेवारीनुसार प्रियांकाने प्रत्येक पोस्टमधून 3 कोटी रुपये कमावले तर विराटने सुमारे 5 कोटींची कमाई केली आहे. टॉप 30 मध्ये प्रियांका 27 व्या आणि विराट 19 व्या स्थानावर आहे.

सलग तिसर्‍या वर्षी या यादीमध्ये प्रियांका आणि विराटने स्थान मिळवले आहे. यापूर्वी 2019 आणि 2020 मध्येसुद्धा या दोन्ही सेलेब्सनी यादीत टॉप 100 मध्ये स्थान मिळवले होते.

टॉप 3 मध्ये या सेलिब्रिटींचा समावेश
इंस्टाग्राम पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणा-यांच्या यादीत सेलिब्रिटी फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. त्याने प्रत्येक पेड पोस्टमधून 11.9 कोटी रुपयांची कमाई करत पहिले स्थान मिळवले आहे. त्याच्यापाठोपाठ ड्वेन जॉन्सन आणि एरिआना ग्रांडे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानावर आहे. एरियाना प्रत्येक पेड पोस्टमधून 10 कोटी कमावते.

100 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असणारा विराट एकमेव भारतीय
दरम्यान, अलिकडच्या काही महिन्यांत प्रियांकाने इंस्टाग्रामवर अनेक उत्पादनांची जाहिरात केली आहे. प्रियांकाचे इंस्टाग्रामवर 65 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर विराट कोहलीचे 132 मिलियनपेक्षा अधित फॉलोअर्स आहेत. मार्च 2021 मध्ये, विराट इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स गाठणारा पहिला भारतीय आणि पहिला क्रिकेटपटू ठरला.

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे ती शेवटची 'द व्हाइट टायगर'मध्ये दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये 'टेक्स्ट फॉर यू' आणि 'मॅट्रिक्स 4' याव्यतिरिक्त मिंडी कॉलिंगसह एका वेडिंग कॉमेडी चित्रपटाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...