आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर कुमार यांच्या बंगल्यात रेस्तराँ उघडणार विराट कोहली:किशोर दांच्या कुटुंबाशी डील फायनल, 5 वर्षांसाठी लीजवर घेतला बंगला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली नवीन रेस्तराँ उघडण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांचा जुहू येथील बंगला भाडेतत्त्वावर घेतला आहे. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, विराट एक उच्च दर्जाचे रेस्तराँ सुरू करणार आहे, त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात हे रेस्तराँ सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

विराटने 5 वर्षांसाठी लीजवर घेतला हा बंगला
किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की, काही महिन्यांपूर्वी सुमित (सुमित कुमार हा किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचा मुलगा आहे) विराटला भेटला होता. यादरम्यान दोघांमध्ये बंगला भाड्याने देण्याबाबत चर्चा झाली. आता अखेर हा बंगला विराटला 5 वर्षांसाठी भाड्याने देण्यात आला आहे.

याच बंगल्यात राहात होते किशोर कुमार
किशोर कुमार यांचा 'गौर कुंज' हा बंगला मुंबईतील जुहू तारा रोडवर आहे. किशोर दा हयात असताना याच बंगल्यात वास्तव्याला होते. किशोर दा यांना बंगल्याभोवतीची हिरवळ आवडायची. बंगल्याच्या आजूबाजूच्या झाडांनाही त्यांनी रंजक नावे दिली होती. बंगल्यात एक गॅरेज देखील होते ज्यामध्ये तो त्याची विंटेज कार पार्क करत असे.

2018 मध्ये हा बंगला वादात सापडला जेव्हा तो रेस्तराँ उघडण्यासाठी 3 वर्षांच्या लीजवर देण्यात आला होता. किशोर कुमार आणि लीला चंदावरकर यांचा मुलगा सुमित यांना बीएमसीने बंगल्याच्या तळमजल्यावरील बेकायदा बांधकामावर आक्षेप घेत नोटीस पाठवली होती.

900 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे विराट
विराटबद्दल बोलायचे झाले तर तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 61 व्या क्रमांकावर आहे. सध्या विराट 30 हून अधिक ब्रँड्स एंडोर्स करत आहे. ब्रँड, आयपीएल आणि मॅच फीसह विराट वार्षिक 200 कोटींहून अधिक कमावतो. विराटची एकूण संपत्ती 900 कोटींहून अधिक आहे.

विराटच्या या नव्या रेस्तराँचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
विराटच्या या नव्या रेस्तराँचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

विराट कोहली अनेक व्यवसायांचा मालक आहे
विराटने याआधीही अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. तो UAE रॉयल्सचा (टेनिस संघ) सह-संस्थापक आहे. याशिवाय तो One8 Commune नावाच्या रेस्टोबारचा मालक आहे. तो Wrogn ब्रँडचा सह-संस्थापक देखील आहे. याशिवाय, विराट इंडियन सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या एफसी गोवा या संघाचा सह-संस्थापक आहे.

13 ऑक्टोबर 1987 रोजी झाले होते किशोर यांचे निधन
किशोर कुमार यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 35 वर्षांपूर्वी (13 ऑक्टोबर 1987) त्यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 110 संगीत दिग्दर्शकांसोबत 2678 चित्रपटांमध्ये गाणी गायली. किशोर दा यांनी जवळपास 88 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले.

बातम्या आणखी आहेत...