आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फोटो:शूटिंग सेटवर पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा, कोहलीचा 'पगडी' लूक सोशल मीडियावर झाला व्हायरल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट-अनुष्काच्या या व्हायरल फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती व क्रिकेटर विराट कोहली नुकतेच मुंबईत एका जाहिरातीच्या शूटिंगच्या सेटवर दिसले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विराट शीख व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर अनुष्कासुद्धा पंजाबी गेट-अपमध्ये दिसत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विराट कोहलीने डोक्यावर काळी पगडी, पांढरा शर्ट आणि क्रीम कलरची पँट घातलेली दिसत आहे. याशिवाय विराट फोनवर बोलताना दिसत आहे. त्याचवेळी अनुष्का फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढरा मास्क घातलेली दिसत आहे. विराट-अनुष्काच्या या व्हायरल फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली असून ते या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सर्वजण विराटच्या पगडी लूकचे कौतुकही करत आहेत.

अनुष्काचे आगामी प्रोजेक्ट्स
विरुष्काने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही गेल्या वर्षी 2021 मध्ये मुलगी वामिकाचे आईबाबा झाले. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर अनुष्काने अलीकडेच तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटासाठी क्रिकेट प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काचे मैदानावर ट्रेनिंगचे घेतानाचे फोटो समोर आले होते.

या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग मे-जून महिन्यात कोलकाता येथे सुरू होणार आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटातून अनुष्का बऱ्याच दिवसांनी सिल्व्हर स्क्रिनवर परतत आहे. ती शेवटची 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' या चित्रपटात दिसली होती, यात तिच्यासह शाहरुख खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

बातम्या आणखी आहेत...