आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

IPL कॉमेंट्री वाद:सुनिल गावस्करांच्या आक्षेपार्ह विधानावर अनुष्काने व्यक्त केली खंत, प्रतिक्रिया देताना म्हणाली - 'क्रिकेटमध्ये माझे नाव ओढले जाणे कधी बंद होईल?'

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काने गावस्कर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचे म्हटले आहे.

माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर यांना आयपीएलच्या कमेंट्रीमधून हकलून लावण्याची मागणी होत आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवर टीका करताना गावस्करांनी असभ्य भाषा वापरली होती. विराटवर भाष्य करताना त्यांनी अनुष्का शर्माच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावरच विरुष्काचे फॅन्स गावस्करांवर भडकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात विराटने केएल राहुलचे कॅच सोडले होते. त्यावर आता अनुष्काची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'विराटने लॉकडाऊनमध्ये केवळ अनुष्काच्या चेंडूंवर प्रॅक्टिस केली", असे विधान गावस्करांनी केले होते. त्यावर अनुष्का नाराज झाली आहे. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने गावस्कर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचे म्हटले आहे.

पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरले जाते? असा प्रश्न उपस्थित करताना अनुष्काने म्हटले की, “खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असे तुम्हाला वाटत नाही का? मला खात्री आहे की, माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करताना तुमच्याकडे इतर पर्यायी शब्द किंवा वाक्य उपलब्ध असतील. हे 2020 असून गोष्टी अद्यापही बदललेल्या नाहीत,'' असे अनुष्का म्हणाली.

पुढे तिने क्रिकेटमध्ये माझे नाव ओढले जाणे कधी बंद होईल?, अशी खंतदेखील व्यक्त केली आहे. ती म्हणते, “आदरणीय मिस्टर गावस्कर, तुम्ही एक महान खेळाडू असून जेंटलमनच्या या खेळात तुमचे नाव नेहमी उंचावर असेल. पण तुम्ही काय बोललात हे कळल्यानंतर मला काय वाटते ते सांगण्याची इच्छा होती”.

काय म्हणाले गावस्कर?

पंजाबविरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूला पराभव पत्कारावा लागला. या पराभवाचे खापर सामना सुरू असताना विराटवर फोडण्यात आले. विराट या सामन्यात काहीच करू शकला नाही. उलट पंजाबचा सर्वात चांगला परफॉर्मर राहिलेल्या केएल राहुलच्या दोन झेल त्याने सोडून दिल्या होत्या. यानंतर केएल राहुलने पंजाबसाठी 134 धावा ठोकल्या. तर विराट स्वतः बॅटिंग करताना केवळ एकाच धावावर बाद झाला.

विराटच्या परफॉर्मन्सवर गावस्कर कमेंट्री करताना भडकले होते. त्यांच्या मते, विराटने लॉकडाऊनमध्ये काहीच सराव केला नाही. "विराटने लॉकडाऊनमध्ये केवळ अनुष्काच्या चेंडूंवर प्रॅक्टिस केली" असे ते म्हणाले होते. गावस्करांना आयपीएलच्या कमेंट्रीमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांना आयपीएलमधून हकलून लावायला हवे अशी मागणी अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांकडून होतेय.

विरुष्काच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया
विरुष्काच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया