आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहे. अनुष्काने 11 जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. ही गोड बातमी विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. विराट आणि अनुष्का आईबाबा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता या दोघांच्या चिमुकलीचा पहिला फोटो समोर आला आहे. विराटचा भाऊ विकासने सोशल मीडियावर बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.
विकासने बाळाच्या पायांचा फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. फोटोला कॅप्शन देताना, 'आम्हाला खूप आनंद झाला असून आमच्या घरी एक परी आली आहे,' असे म्हटले आहे. सोबतच फोटोवर तुझे स्वागत आहे, असा मजकुरही लिहिलेला आहे.
अनंत बाबा ठेवणार बाळाचे नाव
विराट-अनुष्काच्या बाळाच्या जन्मापासून तिचे नाव काय असेल, याबाबत सोशल मीडियावर अंदाज वर्तवला जात आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे नाव अन्वी असे ठेवले गेले आहे. परंतु डीएनएच्या वृत्तानुसार, बाळाचे नाव शर्मा कुटुंबीयांचा आध्यात्मिक गुरू अनंत नारायण ठेवणार आहेत. शर्मा आणि कोहली कुटुंबीय दोघांचीही अनंत बाबा यांच्यावर निष्ठा असून ते त्यांच्या प्रत्येक निर्णयाते नेहमीच पालन करतात, मग ते लग्नाचा निर्णय असो वा घर खरेदी करणे. दोन्ही कुटुंबीय अनंत बाबांचा सल्ला नक्की घेतात.
📸 | @AnushkaSharma and @imVkohli clicked with Maharaj Anant Baba while in Haridwar 💕 #Virushka
— Anushka Sharma FC™ (@AnushkaSFanCIub) November 9, 2018
(https://t.co/MsUTI0qZrY) pic.twitter.com/nJfagjtN4j
अनंत नारायण हरिद्वारमधील अनंत धाममध्ये राहतात. येथे शर्मा कुटुंबीयांचे नेहमीच येणे-जाणे असते. याशिवाय बाबा अनंत नारायण विरुष्काच्या लग्नासाठी इटलीलाही गेले होते.
2017 मध्ये लग्न झाले
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2013 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती. यानंतर या दोघांनाही विरुष्का म्हणून संबोधले जाऊ लागले. अनुष्का आणि विराट यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये लग्न केले. 2020 च्या ऑगस्टमध्ये विराटने अनुष्का गरोदर असल्याचे सांगितले होते. लग्नाच्या 3 वर्षांनी त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. विराट आता 32 वर्षांचा आहे तर अनुष्का देखील 32 वर्षांची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.