आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री अनुष्का शर्मा बुधवारी पती विराट कोहलीसोबत मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलबाहेर दिसली होती. हॉस्पिटलबाहेरील तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. अनुष्का शर्मा प्रेग्नंट असून दुस-यांदा आई होणार असल्याचा अंदाज या फोटोंवरून लोकांनी व्यक्त केला होता. मात्र अनुष्का प्रेग्नंट नसल्याचे सांगितले जात आहे.
फिजिओथेरपिस्टकडे तपासणीसाठी गेली होती अनुष्का
रिपोर्ट्सनुसार, अनुष्का फिजिओथेरपिस्टकडे चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. सध्या अनुष्का तिचा आगामी बायोपिक चित्रपट 'चकदा एक्सप्रेस'चे शूटिंग करत आहे. ज्यामध्ये ती भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अनुष्काला कठोर मेहनत, वेगवान गोलंदाजी आणि क्रिकेटचा सराव करावा लागतोय.
या चित्रपटासाठी अनुष्काला करावी लागतेय हेवी स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी
अनुष्काला 'चकदा एक्स्प्रेस'साठी स्ट्रेचिंग, रनिंग आणि डायव्हिंग यांसारख्या हेवी स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी कराव्या लागतात. कारण, अनुष्का खेळाशी जुळली नसल्याने तिला या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही काही अडचणी येत आहेत. त्यामुळेच अनुष्काला फिजिओथेरपिस्टकडे तपासणीसाठी जावे लागल्याचे म्हटले जात आहे.
अनुष्का सोशल मीडियावर चाहत्यांसोबत चित्रपटाच्या शूटिंग आणि क्रिकेट सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या चित्रपटात झुलन गोस्वामीच्या क्रिकेट कारकिर्दीची आणि आयुष्याची कथा दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुष्का आणि विराट यांना एक मुलगी असून वामिका हे तिचे नाव आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.