आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ती' विरुष्काच्या मुलीची पहिली झलक नाही:विराटचा भाऊ विकासचे स्पष्टीकरण - तो बाळाचा खरा फोटो नव्हता, शुभेच्छा देण्यासाठी रँडम फोटो पोस्ट केला होता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकासने स्वतः या फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 जानेवारी रोजी आईबाबा झाले. त्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विराटचा भाऊ विकास कोहलीने एक फोटो पोस्ट करुन आपला आनंद व्यक्त केला होता. या फोटोत लहान बाळाचे पाय दिसत आहेत. विकासने पोस्ट केलेला फोटो विराट-अनुष्काच्या बाळाचा असल्याचे म्हटले गेले होते. मात्र आता विकासने स्वतः या फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे.

स्पष्टीकरण देताना काय म्हणाला विकास कोहली?
विकासने फोटोसंदर्भात स्पष्टीकरण देताना लिहिले, 'मित्रांनो, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, काल मी विराट आणि अनुष्काचे अभिनंदन करण्यासाठी जो फोटो पोस्ट केला होता, तो प्रत्यक्षात त्यांच्या बाळाचा फोटो नाहीये. शुभेच्छा देण्यासाठी मी रँडम फोटो वापरला होता,' असे विकासने सांगितले आहे.

विकासने 11 जानेवारी रोजी बाळाच्या पायांचा फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला होता. फोटोला कॅप्शन देताना, 'आम्हाला खूप आनंद झाला असून आमच्या घरी एक परी आली आहे,' असे म्हटले होते. सोबतच फोटोवर तुझे स्वागत आहे, असा मजकुरही लिहिलेला होता.

2017 मध्ये लग्न झाले
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2013 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती. यानंतर या दोघांनाही विरुष्का म्हणून संबोधले जाऊ लागले. अनुष्का आणि विराट यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये लग्न केले. 2020 च्या ऑगस्टमध्ये विराटने अनुष्का गरोदर असल्याचे सांगितले होते. लग्नाच्या 3 वर्षांनी त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. विराट आता 32 वर्षांचा आहे तर अनुष्का देखील 32 वर्षांची आहे.

बातम्या आणखी आहेत...