आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
70 च्या दशकातील अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजारानंतर रविवारी निधन झाले. ते बॉलीवूडच्या प्रसिद्ध आनंद कुटुंबातील असून देव आनंद यांचे पुतणे होते. 1976 साली आलेल्या 'चलते चलते' या चित्रपटासाठी त्यांना ओळखले जातो. या चित्रपटातील 'प्यार में कभी कभी' आणि 'कभी अलविदा ना कहना' ही गाणी बरीच लोकप्रिय झाली होती आणि आजही लोकांच्या ओठी रेंगाळतात.
चित्रपटसृष्टीत फारशी कमाल दाखवू शकले नाहीत
सिने प्लॉटच्या रिपोर्टनुसार, विशाल आनंद यांनी दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि चित्रपटात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले होते. दिग्दर्शक देवी शर्मा यांनी 'हमारा अधिकार' (1970) या चित्रपटातून त्यांना ब्रेक दिला होता. या चित्रपटात त्यांची सहकलाकार कुमुद छुगानी होती. मात्र, विशाल आनंद यांना आपले काका देव आनंद यांच्यासारखे यश मिळाले नाही आणि लवकरच त्यांची कारकीर्द संपुष्टात आली.
एकूण 11 चित्रपटांमध्ये काम केले
रिपोर्ट्सनुसार विशाल यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण 11 चित्रपटांमध्ये काम केले. 'हमारा अधिकारी' शिवाय 'सा रे गा मा पा' (1972), 'टॅक्सी ड्रायव्हर' (1973), 'हिंदुस्तान की कसम' (1973), 'चलते चलते' (1976) आणि 'किस्मत' (1980) या चित्रपटांचा समावेश आहे.
बप्पी लाहिरींच्या यशात मोठा वाटा
रिपोर्ट्सनुसार, बप्पी लाहिरी यांना विशाल आनंद यांच्या 'चलते चलते' या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून मोठा ब्रेक मिळाला होता. त्यांनी या चित्रपटाच्या तीन वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण 'चलते चलते'नंतर ते प्रसिद्धी झोतात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.