आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड:विशाल ददलानी आणि मिथिला पालकर यांना कोरोनाची लागण, स्वरा-कुब्रासह हे सेलिब्रिटी आज आले कोविड पॉझिटिव्ह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत: विशाल ददलानी

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अलीकडे अनेक बॉलिवूड सेलेब्स देखील याच्या कचाट्यात आले आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत गायक-संगीतकार विशाल ददलानी आणि अभिनेत्री मिथिला पालकर यांचेही नाव जोडले गेले आहे. विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत: विशाल ददलानी
पोस्ट शेअर करताना विशाल ददलानीने लिहिले, "माझी ही पोस्ट त्या सर्वांसाठी आहे जे गेल्या आठवड्यात किंवा 10 दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत. खंत म्हणजे आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगूनही, माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी कधीही कुठेही मास्कशिवाय कोणालाही भेटलेलो नाही. माझ्या माहितीनुसार, मी निर्जंतुकीकरण न केलेल्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला नाही. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कृपया काळजी घ्या," असे विशाल ददलानीने सांगितले आहे. विशाल व्यतिरिक्त मिथिला पालकर हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिला कोविडची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

विशाल-मिथिलाशिवाय या सेलिब्रिटींनाही आज झाली कोरोनाची लागण
विशाल ददलानी-मिथिला पालकर व्यतिरिक्त आज स्वरा भास्कर आणि तिचे संपूर्ण कुटुंब, कुब्रा सैत आणि साऊथचा सुपरस्टार महेश बाबू हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना लागण झाल्याची माहिती दिली. यापूर्वी, मिमी चक्रवर्ती, अर्जुन कपूर, एकता कपूर, मृणाल ठाकूर, राहुल रवैल, नकुल मेहता आणि त्याचे कुटुंब, शिखा सिंग, वरुण सूद, सुमोना चक्रवर्ती, दृष्टी धामी आणि शिल्पा शिरोडकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आणि ते होम क्वारंटाइन आहेत. विलग्नवास.

देशात 24 तासांत कोरोनाचा आकडा 1 लाख पार झाला आहे

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच संक्रमितांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. 24 तासांत 1 लाख 16 हजार 990 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 302 लोकांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय प्रकरणांमध्ये 85,958 ची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर रोजी देशात 22,775 नवीन रुग्ण आढळले होते. एका आठवड्यात देशात नवीन प्रकरणे जवळपास 5 पट वाढली आहेत.

देशातील एकुण प्रकरणांबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत 3.52 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यापैकी 3.43 कोटी लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत 4 लाख 83 हजार 178 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...