आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणपतीचे पेंडेंट घालण्यावरुन झालेला वाद:रिहानाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी, विश्व हिंदू परिषदेने ट्विटर-फेबसुकच्या सीईओविरोधात दाखल केली तक्रार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिहानाने फोटोशूटचा एक फोटो मंगळवारी फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला होता.

अलीकडेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर करत चर्चेत आलेली आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आता नव्या वादात अडकली आहे. तिने एका लग्झरी ​​​​​​ ब्रँडसाठी एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसतेय. या टॉपसेल फोटोमध्ये तिने गळ्यात भारतीयांचे आराध्य दैवत गणपतीचे पेंडेंट घातले आहे. आता बातमी आहे की, विश्व हिंदू परिषदेने (VHP) ट्विटरच्या सीईओविरोधात दिल्ली आणि मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ट्विटरवर असे फोटो शेअर करून रिहानाने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असे व्हीएचपीचे म्हणणे आहे. परिषदेने रिहानाचे ट्विटर अकाउंटही निलंबित करण्याची मागणी केली आहे.

ट्विटर-फेसबुकच्या सीईओविरोधात तक्रार दाखल केली
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले, ट्विटर आणि फेसबुक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे हिंदुविरोधी कारवाईचे माध्यम बनले आहे. हिंदूंच्या भावना दुखावणा-यांवर ट्विटर आणि फेसबुक कोणतीही कारवाई करत नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सीईओविरोधात मुंबई आणि दिल्ली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रिहानाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी
विनोद पुढे म्हणाले, "आयटी मंत्रालयाकडेही यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच रिहानाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी ट्विटरकडे केली गेली आहे. जर फेसबुक आणि ट्विटरवरील हिंदुविरोधी कारवाया थांबवण्यात आल्या नाहीत तर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बहिष्कार टाकला जाईल," असे विनोद बन्सल यांनी स्पष्ट केले.

राम कदम यांनी घेतला होता रिहानाच्या फोटोवर आक्षेप

दरम्यान भाजपा नेते राम कदम यांनी रिहानाच्या या फोटोवर आक्षेप घेतला आहे. ‘रिहानाने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली आहे आणि हे फार चुकीचे कृत्य आहे. भारतीय संस्कृती विषयी रिहानाला काही ठाऊक नाही, तिला या संस्कृतीबद्दल आदर नाही हे स्पष्ट होत आहे. आता तरी आशा आहे की राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेते तिची मदत घेणे थांबवतील,’ असे ते म्हणाले आहेत.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिहानाने घेतले 18 कोटी रुपये?

रिहानाला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यासंदर्भात पोस्ट करण्यासाठी 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच 18 कोटी रुपये दिले गेल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण घटनेमागे कॅनडातील पोएटिक जस्टीस फाऊंडेशनचा हात असल्याचे सांगितले गेले होते.

रिहानाने शेतकरी आंदोलनावर अमेरिकेतील वृत्तवाहिनी सीएनएनचा हवाला देत, 'आपण भारतातील शेतकरी आंदोलनावर का बोलत नाही,' असा प्रश्न उपस्थित केला होता. या ट्विटला जवळपास 2 लाख लोकांनी रिट्विट केले होते. सद्यस्थितीत रिहानाचे ट्विटरवर 11 कोटी फॉलोवर्स आहेत.