आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मैं हूं ना', 'विवाह' आणि 'जॉली एलएलबी' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अमृता राव लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर 39 वर्षीय अमृताचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अमृता अलीकडेच पती आरजे अनमोलसह डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेली तेव्हाचा हा फोटो आहे, असे सांगितले जात आहे.
अमृता आयुष्याच्या या टप्प्याचा आनंद घेत आहे
रिपोर्ट्समध्ये अमृताच्या निकटवर्ती सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, "अमृता आयुष्याच्या या टप्प्याचा आनंद लुटत आहे. तिच्या जवळच्या मैत्रिणींना तिच्या गरोदरपणाविषयी माहिती आहे. अनमोल आणि अमृता यांनी आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे."
चार वर्षांपूर्वी झाले लग्न
2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलसोबत गुपचुप लग्न केले होते. रिपोर्ट्सनुसार लग्नाआधी 7 वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अमृता म्हणाली होती, "रिलेशनशिपला 7 वर्षे झाली आहेत आणि असा जोडीदार मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. छोटेखानी समारंभात आम्ही लग्न केले होते. लग्नात फक्त फॅमिली मेंबर्स सहभागी झाले होते."
'ठाकरे'मध्ये झळकली होती अमृता
2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ठाकरे' चित्रपटात अमृता राव दिसली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अमृताने त्यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.