आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली. यावेळी करदात्यांना दिलासा मिळाला आहे. सीतारामन यांनी आज नवीन टॅक्स स्लॅब म्हणजेच नवीन कररचनेची घोषणा केली. नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना आयकरात 7 लाखांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. त्याबरोबर या अर्थसंकल्पात कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी टॅक्स स्लॅबच्या निर्णयावर एक ट्वीट केले आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी टॅक्स स्लॅबच्या निर्णयावर ट्वीट करत लिहिले, "स्लॅब 5 लाखावरून 7 लाख करण्याचा निर्णय शानदार आहे, वाह" अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे ‘हा काही योग्य निर्णय नाही’, तर दुसऱ्याने लिहले आहे, ‘जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली यासारख्याच आहेत.’
स्वप्नील जोशीचे ट्वीटही चर्चेत
संसदेत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर अभिनेता स्वप्नील जोशीने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याने "….आज सगळेच experts आहेत !" #Budget असे ट्वीट केले आहे. त्याच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी कमेंट केली आहे. 'त्यातले किमान 90 टक्के आयकर भरत नसतील...' असे म्हटले आहे.
अर्थसंकल्पानुसार, आगामी काळात मोबाईल फोन घेणे स्वस्त होऊ शकते, तर चांदीची खरेदी महाग होऊ शकते. कारण सरकारने मोबाईल फोनच्या सुट्या भागांवरील आयात शुल्क कमी करून चांदीवरील शुल्क वाढवले आहे.
स्वस्त
महाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.