आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त वक्तव्याचा साइड इफेक्ट:विवेक अग्निहोत्रींनी युवराज सिंगचे वडील योगराज यांची चित्रपटातून केली हकालपट्टी, म्हणाले- असे लोक हिंसा पसरवू इच्छितात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • योगराज सिंग यांनी हिंदू आणि हिंदू महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

निर्माते विवेक अग्निहोत्रींनी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांची आपल्या चित्रपटातून हकालपट्टी केली आहे. 'द कश्मीर फाइल्स' हा अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट असून यात योगराज एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार होते. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च महिन्यात सुरु होणार होते, मात्र लॉकडाऊनमुळे ते रखडले. आता ताज्या वृत्तानुसार, योगराज यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगराज सिंग चर्चेत आहेत.

आंदोलनादरम्यान योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. परंतु हिंदूंबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना चित्रपटातून काढण्यात आले आहे.

योगराज सिंग यांचा शेतकरी आंदोलनातील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदू आणि हिंदू महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली. मात्र त्यांना त्यांच्या वक्तव्यामुळे चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली.

विवेक यांनी योगराज यांना पत्र लिहिले

विवेक यांनी एका बातचीतमध्ये सांगितले - योगराज सिंग यांच्याशी माझी दीर्घ चर्चा झाली. माझ्या आगामी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात मी त्यांना एका महत्त्वपूर्ण भूमिकेत कास्ट केले होते. मला माहित आहे की त्यांच्याकडे वादग्रस्त विधाने करण्याचा इतिहास आहे. तरीही मी त्याकडे दुर्लक्ष केले. कारण मी बर्‍याचदा आर्ट आणि आर्टिस्टला एकत्र करत नाही.

राजकारणाला मी नेहमी कलाकारांपासून दूर ठेवतो. पण जेव्हा मला त्यांच्या भाषणाबद्दल कळले तेव्हा मला आश्चर्य वाटले. कारण कोणीही अशा प्रकारे स्त्रियांबद्दल बोलतो हे मला सहन होत नाही. हे कोणत्याही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रीबद्दल नाही तर ज्या पद्धतीने स्त्रियांबद्दल वाईट बोलले जात आहे त्याबद्दल आहे.

त्यांनी हिंसा पसरवण्याचा प्रयत्न केला. माझा चित्रपट काश्मीरमधील अल्पसंख्यांकांच्या नरसंहारावर आहे. जी व्यक्ती धर्माच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करते त्याला मी चित्रपटात घेऊ शकत नाही. म्हणून मी त्यांना एक पत्र पाठवले आणि सांगितले की ते आता माझ्या चित्रपटाचा भाग नाहीत.

युवराजनेही स्वतःला वडिलांच्या विधानापासून दूर ठेवले

युवराज सिंगने देखील स्वतःला वडिलांच्या वक्तव्यापासून दूर केले आहे. त्याने शनिवारी (12 डिसेंबर) आपल्या 39 व्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने योगराज सिंग यांचे विधान वैयक्तिक असून आपल्या वडिलांप्रमाणेच आपली विचारसरणी नसल्याचे सांगितले आहे. वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे दुखवलो असल्याचेही युवराजने म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser