आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द कश्मीर फाइल्स:विकिपीडियाने चित्रपटाला काल्पनिक म्हटल्याने संतापले विवेक अग्निहोत्री, म्हणाले - लवकरात लवकर ते एडिट करा

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकिपीडियाने चित्रपट काल्पनिक कथेवर आधारित असल्याचे म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची कथा काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. एकीकडे चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळाली, तर दुसरीकडे काहींनी याला राजकीय विचारसरणीचा तर काहींनी मुस्लिमविरोधी चित्रपट म्हटले. दरम्यान, विकिपीडियाने आपल्या पेजवर हा चित्रपट काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. यावर विवेक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विकिपीडियाला यात लवकरात लवकर योग्य ते बदल करण्यास सांगितले आहे.

विकिपीडियाने चित्रपट काल्पनिक कथेवर आधारित असल्याचे सांगितले

विकिपीडिया पेजवर या चित्रपटाविषयीची माहिती देताना लिहिले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट असून याचे दिग्दर्शक आणि लेखन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात काश्मिरच्या वादग्रस्त भागातील काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि विस्थापनाची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. 1990 मध्ये काश्मिरमध्ये झालेल्या नरसंहाराची ही कथा आहे. जे एक ठरवून केलेले षडयंत्र असल्याचे मानले जाते.’

विवेक यांनी विकिपीडियाला लवकर एडिट करण्याचा दिला सल्ला

विवेक अग्निहोत्री यांनी याचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, ‘प्रिय विकिपीडिया, यात तर तुम्ही इस्लामविरोधी, प्रोपेगंडा, संघप्रचारक आणि कट्टरतावादी हे शब्द जोडणे तर विसरुनच गेलात. तुम्ही तुमची धर्मनिरपेक्षतेची ओळख विसरत चालले आहात. याला लवकरात लवकर एडिट करा.’

या चित्रपटात विवेक यांच्या पत्नीनेही केले आहे काम
'द कश्मीर फाइल्स'ची कथा काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. या चित्रपटात विवेकची पत्नी पल्लवी जोशीने जेएनयूच्या प्राध्यापिका राधिका मेननची भूमिका साकारली आहे. चित्रपटानुसार, राधिका यांनी विद्यार्थ्यांना 'आझाद काश्मीर'साठी लढण्यासाठी प्रेरित केले होते. या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, प्रकाश बेलावाडी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, पुनीत इस्सार हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...