आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांना आज कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत. विवेक यांना सद्यस्थितीत ओडिशा हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस मुरलीधर यांच्या विरोधात केलेल्या ट्विटबद्दल माफी मागण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
मुळात, 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस मुरलीधर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम नवलखा यांना जामीन दिला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ विवेक यांनी काही ट्विट केले होते. मात्र, न्यायालयाचा अवमान केल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यानंतरही न्यायालयाने त्यांना 16 मार्च 2023 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
विवेक 16 मार्चला कोर्टात हजर झाले नाही
कोर्टाच्या आदेशानंतरही विवेक अग्निहोत्री न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने एक निवेदन जारी केले की, 'आम्ही त्यांना हजर राहण्यास सांगत आहोत. कारण त्यांनी न्यायालयाचाअवमान केला आहे. त्यांना वैयक्तिक पश्चाताप माफी मागण्यास काय हरकत आहे. त्यांना एका प्रतिज्ञापत्राद्वारे पश्चाताप व्यक्त करता येत नाही का, त्यानंतर कोर्टाने अग्निहोत्री यांना 10 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.
गौतमची निर्दोष मुक्तता, जजवर केली टीका
विवेक अग्निहोत्री यांनी न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्यावर पक्षपाताचा आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कार्यकर्ता गौतम नवलखा यांना दिलासा दिल्याचा आरोप केला. गौतम नवलखा याची नजरकैद आणि ट्रान्झिट रिमांड न्यायालयाने रद्द केली होती. याबाबत विवेक अग्निहोत्री यांनी न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्यावर वादग्रस्त ट्विट करून टिका केली.
विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या पत्नी उषा रामनाथन या गौतम नवलखा यांच्या क्लोज फ्रेंड आहेत. विवेकच्या या ट्विटवर तो न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळला. माहितीसाठी, न्यायमूर्ती एस मुरलीधर 2006 ते 2020 पर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. सद्यस्थितीत ते ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.
काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण
1 जानेवारी 1818 रोजी भीमा-कोरेगावच्या लढाईत इंग्रजांनी पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यावर विजय मिळवला होता. यात दलितांचाही सहभाग होता. पुढे कोरेगाव येथील विजयाच्या स्मरणार्थ इंग्रजांनी विजयस्तंभ बांधला. पुढे ते दलित समाजाचे प्रतीक बनले.
1 जानेवारी 2018 रोजी एल्गार परिषदेने लढाईच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत गौतम नवलखा यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या भाषणानंतर हिंसाचार उसळला. यादरम्यान एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून अनेक वाहने जळून खाक झाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.