आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेड स्टोरी:विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाच्या कमाईत 325% ची वाढ, विश्लेषक म्हणाले - हा चित्रपट 50 कोटींचा आकडा सहज पार करेल

अमित कर्ण7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 139 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

विवेक अग्निहोत्रींचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट त्याचा विषय, ट्रीटमंट आणि कलेक्शनमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे केवळ 650 हून अधिक स्क्रीनवर चित्रपट रिलीज होऊनदेखील रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 139 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 12 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांच्या मते, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा गल्ला सहज जमवेल. दुस-या दिवशी त्याने साधलेली वाढ जादुई आहे. रतलामसह देशातील अनेक शहरांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल सुरू आहे.

देशातील अनेक भागात हा चित्रपट हाऊसफुल्ल होतोय
या चित्रपटाची ट्रीटमेंट एकतर्फी असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू आहे. यात काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि अत्याचार दाखवले आहेत. अत्याचार करणा-या दुस-या बाजुला पूर्ण खलनायक म्हणून दाखवले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने देशातील काश्मिरी पंडितांबद्दलच्या प्रचलित विचारसरणीची उकल केली आहे. यावर कोमल नाहटा म्हणतात... "चित्रपटाची मेकिंग तितकीशी चांगली नाही, पण खूप वाईट मेकिंगही म्हणता येणार नाही. खरंतर चित्रपटाचा विषय आणि कथा इतकी मजबूत आहे की लोकांना तो खूप आवडला आहे. हा पाहण्यासारखा चित्रपट आहे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे देशाच्या अनेक भागात चित्रपट हाऊसफुल्ल असल्याच्या बातम्या येत आहेत."

वेदना दाखवतो चित्रपट
यापूर्वी 'शिकारा'सारखे चित्रपट याच विषयावर आले होते, पण तसे कलेक्शन ते करू शकले नाहीत. याआधी आलेले सिनेमे अर्ध्या मनाने बनवल्याचे कोमल नाहटा सांगतात. यासोबतच काश्मिरी पंडितांवर अत्याचार करणाऱ्या खलनायकांप्रतीही चांगुलपणा दाखवण्यात आला होता. पण मुद्दा हा आहे की खलनायक हा खलनायकच असतो, नाही का?

ज्या काश्मिरी पंडितांवर हा चित्रपट आधारित आहे त्यांची शोकांतिका तटस्थ नाही. परिणामी अशा चित्रपटांतून पीडितांची व्यथा जराही मागे न ठेवता मांडली, तरच प्रेक्षक हा चित्रपट पाहायला जातील. उदाहरणार्थ, 'इनग्लोरियस बास्टर्ड'मध्ये हिटलरला शुद्ध खलनायक दाखवण्यात आले होते. ज्यूंचा छळ जशाचा तसा ठेवला होता.

प्रेक्षकांची मोठी मागणी आहे, आता 1000 स्क्रीन काउंट झाला आहे
कोमलप्रमाणेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचाही तर्क आहे. ते म्हणतात, "प्रेक्षक खूप मागणी करत आहेत. शुक्रवारी रात्रीच देश-विदेशातील स्क्रीन काउंट एक हजारावर पोहोचला होता. समीक्षक अशा चित्रपटांना एकतर्फी म्हणत आहेत. ते चुकीचे आहे. माझा प्रश्न आहे की या देशात हिंदू असणं अपमानास्पद आहे का? ज्यांनी काश्मिरी पंडितांना मारून हाकलून लावले, त्यांच्याबद्दल कुठेतरी देवदूत असल्यासारखे बोलले जाते? ज्यूंच्या छळावर चित्रपट असतात तेव्हा प्रश्न उद्भवत नाहीत. हिंदूंवरील अत्याचारावर चित्रपट बनवला तर प्रश्न निर्माण होतात."

'द काश्मीर फाइल्स'प्रमाणे 'द दिल्ली फाइल्स'ही घेऊन येत आहेत
विवेक अग्निहोत्री पुढे 'द ताशकंद फाइल्स' आणि 'द काश्मीर फाइल्स'प्रमाणेच 'द काश्मीर फाइल्स' घेऊन येत आहेत. हा चित्रपट लोकशाहीवर भाष्य करणारा असेल, असे विवेक यांनी सांगितले. दिल्ली दंगलीवर तो आधारित नसेल, हे मात्र निश्चित. यापूर्वी 'चॉकलेट'मध्ये त्यांनी अनिल कपूर आणि इमरान हाश्मीसारख्या अभिनेत्यांसोबत काम केल्याचेही विवेक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...