आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता विवेक आनंद ओबेरॉयने 18 वर्षांपूर्वी कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन (CPAA) सोबत हातमिळवणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी खेड्यापाड्यात राहणा-या शेतक-यांच्या कुटुंबातील कर्करोगाशी झुंज देणार्या 2.5 लाखांहून अधिक मुलांना नि: स्वार्थपणे मदत केली आहे. आता अभिनेत्याने शैक्षणिक मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत पात्र मुलांना 16 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा खेड्यात राहणा-या शेतकरी कुटुंबांतील मुलांना मोठा फायदा होईल. जेईई आणि एनईईटी क्रॅक करण्याचे स्वप्न पाहणार्या मुलांना या शिष्यवृत्तीमुळे मदत होईल.
i30 ट्रेनिंग कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती सुरू केली
विवेकने या शिष्यवृत्तीबद्दल सांगितले की, "जेव्हा खेड्यातील एखादे मूल काही तरी मोठे करतो, त्यामुळे केवळ त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव पुढे जाते. आपल्या आजूबाजूला अनेक प्रतिभावान मुले आहेत. परंतु ते उच्च शिक्षण आणि कोचिंगचा खर्च उचलू शकत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे ते पसंतीच्या महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. ही मुले कुठेही मागे राहू नये, असे मला वाटते. मी आणि माझ्या टीमने त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे, जेणेकरून ते बाहेर जाऊन त्यांचे करिअर घडवू शकतील,' असे विवेकने सांगितले.
शिष्यवृत्ती कार्यक्रम i30 (गणितज्ञ आनंद कुमार यांच्या सुपर 30 प्रोग्रामचे डिजिटायझेशन) प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आला आहे.
i30 प्रोग्राम म्हणजे काय?
ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासाठी i30 प्रोग्राम उच्च गुणवत्ता आणि प्रोग्रेसिव्ह मॉड्यूलचा वापर केला जातो. या अंतर्गत लहान-लहान शहरांमध्ये 90 व्हर्च्युअस लर्निंग सेंटर सुरू केले गेले आहेत. जेणेकरून आयआयटी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी क्लासरुमपर्यंत पोहोचू शकतील आणि कमी किंमतीत जेईई आणि एनईईटीचा अभ्यास करू शकतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.