आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉब्लेम:व्हिसा न घेताच विवेक ऑबेरॉय पोहोचला दुबईत, विमानतळावर मिळाली अशी वागणूक; व्हिडिओ शेअर करुन अभिनेत्याने सांगितला किस्सा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यामुळे माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कठिण झाल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉय खासगी कामानिमित्त दुबईत गेला. मात्र येथे पोहोचताच विमानतळावर त्याची गोची झाली. विवेक चक्क व्हिसाशिवायच दुबईला पोहोचला. मात्र विमानतळावर अधिका-यांच्या मदतीने तो या अडचणीतून बाहेर पडला. एक व्हिडिओ शेअर करत विवेकने तेथे घडलेला संपूर्ण किस्सा सांगितला आहे. सोबतच तेथील सर्व अधिका-यांचे आभारदेखील त्याने व्यक्त केले आहेत. मी व्हिसाची कॉपी आणायला विसरलो

विवेकने शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितले, ‘मी काही खासगी कामासाठी दुबईला आलोय. पण आज सकाळी माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मी जेव्हा दुबईत दाखल झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मी माझ्या व्हिसाची कॉपीच आणली नाही. त्याची हार्ड तसंच सॉफ्ट कॉपी देखील माझ्याकडे नव्हती. त्यामुळे एकच गोंधळ झाला', असे विवेकने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

एअरपोर्ट अधिका-यांनी मला या अडचणीतून बाहेर काढले व्हिडिओत विवेकने पुढे सांगितले, ‘तुम्ही इकडे आल्यानंतर देखील व्हिसा काढू शकता पण तुम्ही आधीच व्हिस काढला असेल तर पुन्हा व्हिसा काढण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे मी अडचणीत सापडलो होतो. पण त्यानंतर अनेकांनी मला मदत केली. मी मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. आपण दुबईमधील लोकं थोडी स्ट्रीक्ट आहेत असे म्हणतो पण तसे नाही. ते खूप चांगले आहेत. विमानतळावरील सर्व अधिकाऱ्यांनी मला मदत केली. मी सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि दुबई विमानतळावर माझी मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो,’ असे विवेकने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...