आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमोशनल:सुशांत प्रकरणात विवेक ओबेरॉय म्हणाला - 'चित्रपटसृष्टी जी स्वत:ला एक कुटुंब म्हणते, तिला आता आत्मपरिक्षण करायची गरज आहे' 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवेकने चित्रपटसृष्टीसाठी एक खुलं पत्र लिहिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधून अभिनेता विवेक ओबरॉयसह अनेक कलाकार हजर होते. अंत्यविधीला उपस्थित राहिल्यानंतर विवेकने चित्रपटसृष्टीसाठी एक खुलं पत्र लिहिले आहे. अंत्यसंस्कारावेळी  आणि या इंडस्ट्रीत राहून त्याला जे काही जाणवले त्याबद्दल त्याने या पत्रात लिहिले आहे. चित्रपटसृष्टीविषयी विवेक म्हणाला की, ही जी इंडस्ट्री स्वत:ला एक कुटुंब म्हणते, तिला आता आत्मपरिक्षण करायची गरज आहे. 

सोमवारी रात्री लिहिलेल्या आपल्या पत्रात विवेक म्हणाला, 'सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आज मन हेलावून गेले आहे. त्याच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली असती तर मी माझा अनुभव सांगून त्याच्या वेदना कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. या वेदनांच्या प्रवासात एकेकाळी मीसुद्धा होतो आणि हे खूप त्रासदायक असते. पण आत्महत्या हा उपाय असू शकत नाही.'

'वडिलांच्या डोळ्यांत असह्य वेदना होत्या'

विवेकने पुढे लिहिले, 'आपल्या मुलाला मुखाग्नी देताना त्याच्या वडिलांच्या डोळ्यात जे दु:ख होतं, ते सहनशक्तीपलीकडचं होतं. त्याची बहीण त्याला परत ये म्हणत जोरजोरात रडत होत', अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. 

चित्रपटसृष्टीला आत्मपरीक्षण करण्याची वेळ

विवेकने पुढे लिहिले, “चित्रपटसृष्टी जी स्वत:ला एक कुटुंब म्हणते, तिला आता आत्मपरिक्षण करायची गरज आहे. एकमेकांबद्दल गॉसिक कमी आणि काळजी जास्त करा. अहंकार कमी करून प्रतिभावान लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये प्रतिभेला खतपाणी मिळाले पाहिजे, ती पायाखाली चिरडली गेली नाही पाहिजे. इथे कलाकारांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांचा वापर नाही. आपण सर्वांनी डोळे उघडून पाहण्याची ही वेळ आहे.'

View this post on Instagram

#RIPSushantSinghRajput 🙏

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on Jun 15, 2020 at 11:08am PDT

बातम्या आणखी आहेत...