आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमध्ये कोरोना:बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच विवेक ओबरॉयने केली प्रार्थना, ट्विट करत म्हणाला... 

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवेक ओबरॉयने बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.
Advertisement
Advertisement

शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर रविवारी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अभिषेक बच्चनने ट्विट करुन ही माहिती दिली. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्या यांना घरीच क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. 

चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. यात अभिनेता विवेक ओबेरॉयचाही समावेश आहे. विवेकने ट्विटरवर आराध्या आणि ऐश्वर्याला कोरोना झाल्याची बातमी शेअर करत बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

यापूर्वी बिग बी-अभिषेकसाठी देखील केले होते ट्विट : यापूर्वी बिग बी आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच विवेकने ट्विट करत दोघांनाही काळजी घेण्यास सांगितले होते. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते, 'बच्चन सर आणि ज्युनिअर बच्चन हे लवकर बरे व्हावेत म्हणून आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत. तुम्ही काळजी घ्या', असे विवेक म्हणाला होता.

ऐश्वर्यावरचे मीम शेअर करुन वादात अडकला होता विवेक : मे 2019 मध्ये विवेकने ऐश्वर्यावर एक मीम शेअर केला होता, ज्यामुळे तो चांगलाच वादात सापडला होता. एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा मीम विवेकने पोस्ट केला होता. यावरुन राज्य व केंद्रीय महिला आयोगाने त्याला नोटीसही पाठवली होती.  शेअर केलेल्या मीमवरून होणारा वाद पाहता विवेकने ते ट्विट डिलीट करत माफी मागितली होती. 

मागील वर्षी एग्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेकने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला होता. या मीममध्ये तीन फोटो होते. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो होता आणि त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले होते. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचा फोटो  होता. त्या फोटोत एग्झिट पोल असे लिहिले होते. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा फोटो होता. आणि त्या फोटोखाली रिझल्ट असे लिहिले होते. 

हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नव्हते. मात्र ते रीट्विट करत विवेकने लिहिले म्हणाला होता की, हे मीम मला खरोखरच आवडले आहे. हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा, असे त्याने म्हटले होते.

ऐश्वर्यासोबत झाले होते विवेकचे ब्रेकअपः सलमान खानसोबत ब्रेकअपनंतर ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी 'क्यों हो गया ना' या चित्रपटात एकत्र काम केले होते. ऐश्वर्या आणि विवेक जवळ आल्यावर सलमानला ते सहन झाले नव्हते. सलमानने विवेकला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या कारणास्तव, विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद बोलावून मीडियाला सलमानच्या कृत्याविषयी सांगितले होते.  त्याचा परिणाम असा झाला की, ऐश्वर्यानेही त्याला टाळण्यास सुरुवात केली आणि नंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते.

Advertisement
0