आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सँडलवुड ड्रग्ज रॅकेट:विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला CCB ने केली अटक, 4 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल झाल्यापासून होता फरार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य अल्वा हा सँडलवूड ड्रग्ज रॅकेटमधील सहावा आरोपी आहे.

सँडलवुड ड्रग्ज प्रकरणी बेंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रँचने (CCB) अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा याला अटक केली आहे. वृत्तानुसार सोमवारी मध्यरात्री त्याला अटक झाली. आदित्य कर्नाटक सरकारमधील मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. कन्नड अभिनेता-अभिनेत्रींना ड्रग्ज पुरवणा-या 12 आरोपींपैकी आदित्य एक असून या सर्वांविरोधात 4 सप्टेंबर रोजी कॉटनपेट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आदित्य अल्वा फरार होता.

पोलिसांनी त्यांच्या निवेदनात सांगितले...

आपल्या निवेदनात सह पोलिस आयुक्त (क्राइम) म्हणाले, "कॉटनपेट ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी आदित्य अल्वा याला अटक करण्यात आली आहे. त्याचा सातत्याने शोध घेण्यात येत होता. माहिती मिळाल्यानंतर त्याला काल रात्री चेन्नई येथून अटक करण्यात आली." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणातील आदित्य सहावा आरोपी आहे.

येलहेंका येथील एका खासगी हॉटेलमध्ये 5 जुलै रोजी झालेल्या पार्टीत सहभागी आदित्य सहभागी होता, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

विवेकच्या घरी टाकण्यात आला होता छापा

20 सप्टेंबर रोजी सीसीबीने उत्तर बेंगळुरूच्या हेब्बल येथील अल्वाच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. यापूर्वी आदित्य अल्वाला लुकआउट नोटीस बजावण्यात आली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये पोलिसांनी अल्वाच्या शोधात विवेक ओबेरॉयच्या मुंबईच्या निवासस्थानावर छापा टाकला आणि विवेकची पत्नी प्रियांका अल्वा यांना नोटीस बजावून चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले होते.

या 12 जणांवर गुन्हा दाखल आहे

याप्रकरणी प्रथम अटक परिवहन अधिकारी बीके रविशंकर यांना झाली होती. रविशंकर कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या चौकशीच्या आधारावर 12 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्री रागिनी द्विवेदी, तिचे निकटवर्तीय शिवप्रकाश, पार्टी संयोजक वीरेन खन्ना, व्यावसायिक प्रशांत रांका, वैभव जैन, आदित्य अल्वा, आफ्रिकन ड्रग्ज सप्लायर लोम पेपर सांबा, प्रशांत राजू, अश्विन, अभिस्वामी, राहुल टोंसे आणि विनय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने रागिनी आणि शिवप्रकाश हे मुख्य ड्रग पॅडलर असल्याचे सांगितले.

ड्रग पॅडलर्स कोड शब्दांचा वापर करायचे

चौकशीनुसार, पॅडलर्स ड्रग्जसंदर्भात कोड शब्द वापरायचे. अधिक नशेच्या ड्रग्जसाठी हॅली किटी हा कोर्ड वर्ड वापरला जायचा. विशेष म्हणजे आरटीओचे कर्मचारी असलेले रविशंकर यांचे नाव एफआयआरमध्ये नाही. रविशंकर यांनी सांगितल्यानुसार, आफ्रिकन ड्रग्ज सप्लायर सांबा शहरातील अनेक भागात आयोजित पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवत होता. पोलिसांनी रागिनी द्विवेदी, संजना गलराणी, वीरेन खन्ना, एजंट राहुल टोंसे यांनाही अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...