आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्दर्शकाचा खुलासा:'हेट स्टोरी'साठी विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सुशांत सिंह राजपूतला केले होते साइन, एकता कपूरमुळे हे घडू शकले नाही

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हेट स्टोरी' हा त्याचा पहिला चित्रपट ठरु शकला असता.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. सुशांतला बर्‍याच चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते, ज्यामुळे नैराश्यात येऊन त्याने आपले आयुष्य संपवले, असे काही लोकांचे म्हणणे आहे. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात  एकता कपूर, करण जोहर, संजय लीला भन्साळी यांच्यासह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बातमी आहे की सुशांतला 'हेट स्टोरी' या चित्रपटासाठी साइन करण्यात आले होते, हा त्याचा पहिला चित्रपट ठरु शकला असता, पण एकता कपूरमुळे हे शक्य झाले नाही.  

सुशांतच्या निधनानंतर प्रत्येकजण त्याचे स्मरण करून त्याला श्रद्धांजली वाहात आहे. दरम्यान, फिल्ममेकर विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सुशांतसाठी एक सुंदर डूडल आर्ट शेअर केले आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे - 'सुशांतला माझ्याकडून श्रद्धांजली'.

या पोस्टवर काही लोक सुशांतसाठी प्रार्थना करत असताना एका यूजरने विवेकला उद्देशून लिहिले की- 'तो जिवंत असताना तुम्ही काही चित्रपट त्याला ऑफर करायला हवे होते'. त्याच्या उत्तरात विवेक यांनी खुलासा केला की, 'मी त्याला हेट स्टोरीसाठी साइन केले होते. त्याला पहिला चित्रपट करार. पण बालाजीने त्याला रिलीज केले नाही'. विशेष म्हणजे जेव्हा सुशांतने हा चित्रपट साइन केला होता, तेव्हा तो एकता कपूरच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. त्यानंतर लवकरच सुशांतने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.

विवेक रंजन दिग्दर्शित 'हेट स्टोरी' हा चित्रपट 2012 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या एका वर्षानंतर सुशांतने 'के पो चे' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी 'हेट स्टोरी', 'जिद', 'जुनूनियत' सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...