आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

82 वर्षांच्या झाल्या वहीदा रहमान:वहीदा यांची डॉक्टर होण्याची होती इच्छा, गुरुदत्त यांनी दिली होती मोठी संधी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 फेब्रवारी 1936 रोजी त्यांचा जन्म झाला.

'चौदवी का चाँद' हे गाणे ऐकले की आपल्या डोळ्यासमोर येतो वहीदा रहमान यांचा देखणा चेहरा आणि बोलके डोळे. कुठल्याच प्रकारे कोणतेही अभिनयाचे शिक्षण न घेता चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले अढळ असे स्थान निर्माण केले आहे. वहीदा रहमान आज त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहे. 3 फेब्रवारी 1936 रोजी त्यांचा जन्म झाला.

असे म्हणतात, की वहिदा इतक्या देखण्या होत्या की चित्रपटाच्या शूटवेळी त्यांचे सौंदर्य पाहून त्यांच्या सोबत काम करणारे अभिनेते बऱ्याचदा डायलॉग्जही विसरुन जात. वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत आई आणि प्रेमिका या दोन्ही भूमिका केल्या आहेत. 'अदालत' (1976) चित्रपटात प्रेमिका आणि 'त्रिशूल' (1978) चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका केली आहे.

डॉक्टर होण्याची होती इच्छा
वहीदा यांना बालपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. त्यांनी आपली कारकीर्द तामीळ आणि तेलुगू सिनेमांपासून सुरू केली असली तरी त्यांच्या हिंदी सिनेमांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. त्यांना त्यांच्या करिअरमधला मोठा ब्रेक 'सीआयडी'मध्ये खलनायिकेच्या रुपात मिळाला.

गुरुदत्त यांनी दिली होती मोठी संधी
तामिळ सिनेमातील वहिदा यांचा जबरदस्त अभिनय बघून गुरुदत्त भारावले होते. त्यानंतर वहीदा गुरुदत्त यांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत सामिल झाल्या. हे दोघे आपल्या खासगी आयुष्यातही जवळ आले होते. 'प्यासा' या सिनेमानंतर रिलीज झालेला 'कागज के फूल' हा सिनेमा या दोघांच्या प्रेमावरच आधारित असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर या दोघांनी 'चौदहवीं का चाँद' (1980) आणि 'साहिब बीबी और गुलाम' (1962) या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. गुरुदत्त आणि वहीदा रहमान ही जोडी भारतीय सिनेमातील ऑन स्क्रिनवरील सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक होती.

प्रेम उमलण्याआधीच कोमेजले
गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांचे प्रेम उमलण्याआधीच कोमेजले. 10 ऑक्टोबर 1964 रोजी गुरुदत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे वहीदा रहमान कोलमडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःला सावरत 1965 साली 'गाईड' सिनेमात काम केले. हा सिनेमा तुफान गाजला होता. या सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. 'गाईड'नंतर 1968 साली रिलीज झालेल्या 'नीलकमल' या सिनेमाने वहीदा यांना यशोशिखरावर पोहोचवले.

अभिनेता कमलजीतसह लग्न
1974 साली त्यांनी अभिनेता कमलजीतबरोबर लग्न करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर वहीदा बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांना दोन मुले आहेत.

अनेक वर्षे सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर 1991 साली 'लम्हे' या सिनेमाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या. 2000 साली पतीच्या निधनामुळे त्यांना मोठा झटका बसला होता. मात्र पुन्हा एकदा स्वतःला सावरत त्यांनी 'दिल्ली 6' आणि 'रंग दे बसंती' या सिनेमांमध्ये काम केले आणि त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाल्या. सध्या वहीदा मुंबईत आपल्या दोन मुलांसह राहतात.

बातम्या आणखी आहेत...