आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरल्या फक्त आठवणी:मीकासोबत झालेल्या अखेरच्या संभाषणात प्रकृतीबद्दल चिंतीत होते वाजिद, म्हणाले होते - माझ्यासाठी प्रार्थना कर मित्रा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद तुटली आहे. वाजिद खान यांनी मुंबईतील सरना हॉस्पिटलमध्ये रविवारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाजिद खान यांचे काही दिवसांपूर्वी गायक मीका सिंहसोबत बोलणे झाले होते. त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ समोर आला आहे. यामध्ये वाजिद मीकाला त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायला सांगत आहे. 

'माझ्यासाठी प्रार्थना कर मित्रा'

एंटरटेन्मेंट वेबसाइट पीपिंगमूनने संगीतकार वाजिद आणि गायक मीका यांच्या संभाषणाचा ऑडिओ शेअर केला आहे. यामध्ये वाजिद म्हणत आहेत, 'मीका भाई, खूप खूप धन्यवाद. तुमचा मेसेज वाचला, खूप बरे वाटले. आता तुमच्याकडून प्रार्थनेची अपेक्षा आहे. आता प्रकृती बरी होत आहे. अल्लाहने ठरवले तर मी लवकरच बरा होईल, इंशाअल्लाह..."

शस्त्रक्रियेनंतरही वाजिद चिंतीत होते

वाजिद किडनीच्या आजाराशी लढा देत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. पण शस्त्रक्रियेनंतरही ते आपल्या प्रकृतीबाबत चिंतीत होते, हे त्यांच्या ऑडिओ मेसेजवरुन स्पष्ट होते. ते म्हणाले होते, "ऑपरेशन तर झाले आहे. आता बाकी सगळ्या गोष्टी... प्रार्थना करा की तुमचा भाऊ पुन्हा तुमच्या सोबत उभा राहिल... फक्त प्रार्थनेत आठवण काढा. धन्यवाद. तुमच्या प्रेम, काळजी आणि आधारासाठी खूप खूप धन्यवाद. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. खूप खूप धन्यवाद."

लॉकडाऊनमुळे वाजिद यांची भेट घेऊ शकला नाही मीका

मीका यांनी एंटरटेन्मेंट वेबसाइटला सांगितले की, "त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत मला अजून काही माहिती मिळाली नाही. जर कोविड -19 मुळे त्यांचे निधन झाले असेल तर मी घरातून प्रार्थना करेल आणि तसे नसेल तर त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.'  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्यांना भेटू शकलो नाही. त्यांना भेटायला जाण्याचा विचार मनातच राहून गेला. त्यांचे जाणे हा आमच्या इंडस्ट्रीसाठी खूप मोठा धक्का आहे, असेही मीका म्हणाला. 

वाजिद यांच्या संगीत दिग्दर्शनात मीकाने 'सुल्तान'मधील '440 व्होल्ट' आणि 'राउडी राठौर'मधील 'चिंता ता त' ही गाणी गायली आहेत.

इंस्टाग्रामवरूनही श्रद्धांजली वाहिली

मीकाने इंस्टाग्रामच्या माध्यमातूनही वाजिद यांना आदरांजली अर्पण केली आहे. काही फोटो शेअर करुन त्याने लिहिले, "आपल्या सर्वांसाठी अतिशय वाईट बातमी. इंडस्ट्रीत अनेक हिट गाणी देणारे अत्यंत प्रतिभावान संगीतकार, माझा मोठा भाऊ वाजिद खान आम्हाला सोडून गेला.  त्याचा आत्म्यास शांती लाभो. तुमच्यावर आम्ही कायम प्रेम करु, तुमची उणीव कायम भासेल. तुमचे संगीत बहारदार आहे... बॉलिवूडसाठी खरोखर एक मोठे नुकसान आहे. "

बातम्या आणखी आहेत...