आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीवरुन वाद:साजिद खान आणि सासूविरोधात हायकोर्टात गेली दिवंगत वाजिद खानची पत्नी, म्हणाली - नव-याच्या संपत्तीवर फक्त माझा आणि माझ्या मुलांचा हक्क आहे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाजिद खान यांची संपत्ती 16 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

दिवंगत गीतकार आणि गायक वाजिद खान यांची पत्नी कमालरुख खान हिने तिचे दीर साजिद खान आणि सासू राजीना यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालायात धाव घेतली आहे. तिने साजिद खान आणि त्यांच्या आईच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत. साजिद खान आणि त्यांच्या आईने आपल्याला कुटुंबाच्या संपत्तीतून वगळल्याचे तिने म्हटले आहे. कमालरुखने मुंबई उच्च न्यायालयात आपल्या अधिकारांची मागणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, वाजिद खान यांनी 2012 मध्ये आपले मृत्यूपत्र बनवले होते. कमालरुखच्या दाव्यानुसार, वाजिद यांनी आपल्या संपत्तीत केवळ तिला आणि तिच्या मुलांना वारसदार बनवले होते.

कोर्टाने साजिद आणि राजीना यांच्याकडे मागितला मालमत्तेचा तपशील
कमालरुख खानच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने साजिद खान आणि त्यांच्या आईकडे मालमत्तेचा तपशील मागितला आहे. वाजिद यांची एकुण संपत्ती 16 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. यात काही प्रसिद्ध आर्टिस्टच्या पेंटिंग्सचाही समावेश आहे. या पेटिंग्सची किंमत कमालरुख खानने आठ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. या पेटिंगमध्ये एमएफ हुसैन यांची अनेक पेंटिंग आणि स्केचेस आहे. याशिवाय तैय्यब मेहता, वीएस गायतोंडे, एसएच रजा यांची प्रत्येकी एक तर जे स्‍वामीनाथ यांची दोन पेंटिंग आहे.

कमालरुखने म्हटल्याप्रमाणे, 2003 मध्ये स्पेशल मॅरेज अॅक्टअंगर्गत तिने वाजिद खान यांच्याशी लग्न केले होते. मात्र खान कुटुंबाने कधीच तिला आणि तिच्या मुलांना स्वीकारले नाही. वाजिद यांच्या निधनानंतर कमालरुख खान कुटुंबाकडे आपल्या नव-याचा संपत्तीचा वाटा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.

जून 2020 मध्ये झाले होते वाजिद खान यांचे निधन
प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद फेम वाजिद खान यांचे 1 जून 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या सहा महिन्यानंतर कमालरुख हिने खान कुटुंबावर गंभीर आरोप लावले होते. कमालरुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने लिहिले होते की, 'सासरची मंडळी आमची उरली सुरली संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचाही दबाव टाकत आहेत. वाजिद यांच्या निधनानंतर आमच्याजवळ जे काही उरले आहे ते देखील काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच नाइलाजाने मला कायदेशीर मदत घ्यावी लागत आहे. माझ्या मुलांचा हक्क असलेली संपत्ती सासरचे लोक विकत आहेत, माझ्या मुलांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी आता मला लढणे गरजेचे झाले आहे.'

वाजिदच्या कुटुंबाने का केला नाही कमालरुखचा स्वीकार?
याविषयी सांगताना कमालरुखने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते, 'मी पारसी आहे आणि ते मुस्लीम होते. आम्ही तेच होतो ज्यांना कॉलेज स्वीटहार्ट्स म्हटले जायचे. अखेर आमचा विवाह झाला. स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत आमचे लग्न झाले. माझे पालन पोषण एका साधारण पारसी कुटुंबात झाले. आमच्या घरातील लोकांचे विचार लोकतंत्र मानणारे होते. खुल्या विचारांचे होते. स्वातंत्र्याचे होते. वादविवाद करणे, मुद्यांवर चर्चा करणे हे आदर्श मानले जात होते. खान यांच्याशी लग्नानंतर हे स्वातंत्र्य, लोकशाही मुल्ये, शिक्षण या गोष्टी माझ्या सासरच्या लोकांसाठी एक समस्या बनू लागली होती.'

कमालरुखने म्हटले होते, "एक महिला धर्माच्या नावाखाली किती अडचणींचा सामना करते हे मला सांगायचे आहे. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि डोळे उघडणारी आहे. धर्मांतरणासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता. त्यानंतर हा वाद आमच्या घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचला होता. मी सर्व धर्मांचे महत्व जाणते. मात्र, धर्मांतरणावर माझा विश्वास नाही. माझा आत्मसन्मान मला इतर धर्म स्वीकारण्याची परवानगी देत नाही." कमालरुख आणि वाजिद खान यांची अर्शी ही मुलगी आणि रेहान हा मुलगा आहे. मुलीचा जन्म 2004 मध्ये तर मुलाचा जन्म 2011 मध्ये झाला होता.

बातम्या आणखी आहेत...