आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांचे निधन:'राम लखन' आणि 'सौदागर' या चित्रपटांचे एडिटर काळाच्या पडद्याआड, सुभाष घई यांनी वाहिली श्रद्धांजली

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोव्याहून मुंबईला आले होते वामन भोसले

राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील गोरेगाव येथील राहत्या घरी पहाटे चार वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. घई यांनी लिहिले, "वामन भोसले सरांचा आत्म्याला शांती लाभो. माझा पहिला चित्रपट 'कालीचरण'चे जिनिअस संपादक होते, ते नंतर 'खलनायक'पर्यंत माझ्या सर्व चित्रपटाचे एडिटर शिक्षक राहिले आणि त्यांनी मला 'ताल'सारख्या चित्रपटांच्या एडिटिंगसाठी प्रेरणा दिली, एक उत्तम शिक्षक' अशा शब्दांत घई यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

1978 मध्ये मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार
राज एन. सिप्पी दिग्दर्शित आणि विनोद खन्ना-विद्या सिन्हा स्टारर 'इनकार' या चित्रपटासाठी वामन भोसले यांना 1978 मध्ये बेस्ट एडिटिंगचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिलीप कुमार, राजकुमार, मनीषा कोईराला आणि विवेक मुशरान स्टारर आणि सुभाष घई दिग्दर्शित 'सौदागर' या चित्रपटासाठी वामन यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

गोव्याहून मुंबईला आले होते वामन भोसले
वामन भोसले यांचा जन्म गोव्यात झाला. तिथे प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर 1952 मध्ये ते मुंबईत आले. येथे एडिटर डी.एन. पै यांच्या मार्गदर्शनात त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये एडिटिंगचे धडे गिरवले होते. त्यानंतर फिल्मिस्चान स्टुडिओमध्ये त्यांनी 12 वर्षे सहायक संपादक म्हणून काम केले होते.

1967 मध्ये मिळाला होता पहिला मोठा प्रोजेक्ट

1967 मध्ये राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला 'दो रास्ते' हा एडिटर म्हणून वामन यांचा पहिला मोठा प्रोजेक्ट होता, या चित्रपटासाठी त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. नंतर त्यांनी खोसला यांच्या व्यतिरिक्त गुलजार, सुभाष घई, शेखर कपूर, रवी टंडन, महेश भट्ट, राज सिप्पी, अनिल गांगुली, सुनील दत्त, विक्रम भट्ट आणि के विश्वनाथ अशा अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी एडिट केलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये 'मेरा गांव मेरा देश', 'दो रास्ते', 'इनकार', 'दोस्ताना', 'गुलाम', 'अग्निपथ', 'हीरो', 'कालीचरण', 'राम लखन' आणि 'सौदागर' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...