आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात समुंदर पार या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीची आज 29 वी पुण्यतिथी आहे. दिव्याचे लग्न प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्याशी झाले होते. दिव्याच्या निधनाच्या काही वर्षांनी साजिद यांनी वर्धा खान हिच्याशी दुसरे लग्न थाटले. वर्धा खान हिने एकदा सांगितले होते की, साजिद यांनी आजही दिव्याचे परफ्यूम आणि हेअर प्रॉडक्ट जपून ठेवले आहेत. वर्धाने सांगितल्यानुसार, साजिदने दिव्याच्या आईवडिलांची अगदी मुलासारखी काळजी घेतली. दिव्याचा लग्नाच्या 11 महिन्यांनंतर 5 एप्रिल 1993 रोजी मृत्यू झाला होता.
साजिद दिव्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे
काही वर्षांपूर्वी वर्धाने मुलाखतीत सांगितले होते की, "साजिद दिव्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. दिव्याच्या आईच्या मृत्यूनंतर ते दिव्याच्या वडिलांची अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे काळजी घेतात. बाबा आणि साजिद किती जवळ आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. कुणाल तर एका भावासारखा आहे. मी कधीच दिव्याला रिप्लेस करण्याचा प्रयत्न केला नाही, मी स्वतःची जागा बनवली आहे. ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि आठवणी नेहमीच सुंदर असतात, त्यामुळे मला ट्रोल करणे थांबवा. लोक म्हणतात दिव्या खूप छान होती, अर्थातच ती खूप छान होती. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो आणि ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे."
साजिदकडे अजूनही दिव्याचा परफ्यूम आहे
वर्धाने सोशल मीडियावर लिहिले, "साजिदकडे अजूनही दिव्याचा शेवटचा स्पर्श असलेला परफ्यूम, हेअर प्रोडक्ट आणि काही वस्तू आहेत. ती साजिदच्या डेब्यू फिल्म सात समुंदरचा एक भाग होती."
वर्धा मुलाखतीत सांगितले होते होते, "होय.. मला वाटते की तिने आम्हाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मी #साजिद नाडियाडवाला यांना तिच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एका मुलाखतीसाठी भेटले होते. साजिद, दिव्याचे वडील आणि माझे सासरचे लोक मला अनेकदा म्हणतात की, ती माझ्यासारखीच होती, अगदी तोच स्वभाव, तोच वेडेपणा आणि वागणूक होती."
पाचव्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू
पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने दिव्याचे निधन झाले, असे सांगितले जाते. परंतु तिचा मृत्यू आजही रहस्यच आहे. दिव्याच्या निधनानंतर साजिद नाडियाडवाला यांनी नोव्हेंबर 2000 मध्ये वर्धा खानशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत.
1992 मध्ये 'विश्वात्मा'द्वारे केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
दिव्याने तिच्या करिअरची सुरुवात 1990 मध्ये डी रामनायडू यांच्या 'बोबली राजा' या तेलुगू चित्रपटातून केली होती. यानंतर 1992 मध्ये आलेल्या 'विश्वात्मा' चित्रपटाद्वारे तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. त्याच वर्षी दिव्या डेविड धवन यांच्या 'शोला और शबनम' चित्रपटात गोविंदाच्या अपोझिट दिसली. दिव्याचा हा पहिलाच हिट चित्रपट होता. 1992 मध्ये ती 'दीवाना', 'जान से प्यारा', 'दिल आशना है', 'बलवान', 'दिल ही तो है', 'दुश्मन जमाना', 'गीत'मध्ये झळकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.