आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:अभिनेते प्रकाश राज यांचा खुलासा, व्हिडीओ शेअर करुन म्हणाले - इंडस्ट्रीतील घराणेशाही तो सहन करु शकला नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर अभिनेते प्रकाश राजसुद्धा व्यक्त झाले आहेत.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. अखेर असे काय घडले ज्यामुळे सुशांतला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. गेल्या काही काळापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता, हीच एक गोष्ट समोर आली आहे. मात्र बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे त्याला बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले, असे मत काही कलाकारांनी व्यक्त केले आहे.  

2017 मधील आयफा इव्हेंटमधील सुशांतचा व्हिडीओ केला शेअर

प्रकाश राज यांनी सुशांतचा एक व्हिडीओ शेअर करत घराणेशाहीच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ 2017 च्या आयफा इव्हेंटचा आहे. यात सुशांत म्हणाला होता, ''घराणेशाही सर्वत्रच आहे. सर्वत्रच आहे. त्याचं आपण काही करु शकत नाही. नेपोटीझमच्या अस्तित्वाबाबत काही करता येऊ शकत नाही. पण, त्याचवेळी योग्य अशा कौशल्यवान व्यक्तींना पुढे येण्याची संधी मिळत नाही किंवा तुमच्याकडून ती दिली जात नाही तेव्हा मात्र इथे मोठी अडचण आहे. तेव्हा कलाविश्वाचा हा सारा डोलाराच कोसळू शकतो.'' 

प्रकाश राज म्हणाले - मीही घराणेशाहीला सामोरं गेलो आहे

प्रकाश राज यांनी सुशांतचा हा व्हिडीओ शेअर करुन म्हटले की, ’मीसुद्धा घराणेशाहीला सामोरं गेलो आहे. त्यातून मी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्या जखमा खोलवर अजूनही ताज्या आहेत. पण सुशांत सिंह राजपूत ते सहन करू शकला नाही. आपण यातून काही शिकणार आहोत का? अशा स्वप्नांचा अंत थांबवण्यासाठी आपण याविरोधात आवाज उठवणार आहोत का’, असा सवाल त्यांनी केला आहे.

दावा - सुशांतच्या हातून सहा महिन्यांत सात चित्रपट गेले 

याप्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे एक ट्विटही व्हायरल होत आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘छिछोरे’ हिट झाल्यानंतर सुशांतकडे सात चित्रपट होते. पण सहा माहिन्यांमध्येच त्याच्या हातून हे चित्रपट निघून गेले. पण का? असा प्रश्न बॉलिवूड इंडस्ट्रीला विचारला आहे. 

निरुपम यांनी ट्विट केले,  ‘छिछोरे चित्रपट हिट झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतने सात चित्रपट साइन केले होते. सहा महिन्यातच त्याच्याकडून ते चित्रपट गेले. का? फिल्म इंडस्ट्रीमधील निष्ठुरता एका वेगळ्याच पातळीवर काम करते. याच निष्छुरतेने आज एका प्रतिभावान कलाकाराचा जीव घेतला आहे.’ 

Advertisement
0