आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमा कॅलेंडर:नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पाहा किआरा, राणी, जान्हवीचे चित्रपट,  चित्रपटगृहात पुढच्या तीन महिन्यांत रिलीज होणार आहेत हे 18 चित्रपट

अमित कर्ण. मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुने चित्रपट ऑक्टोबरमध्ये काही ठिकाणी पुन्हा प्रदर्शित होणार आहेत.

देशातील बऱ्याच भागात सिनेमागृह उघडण्याची परवानगी मिळताच मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनच्या लोकांनी तयार केली आहे. मल्टिप्लेक्स मालकांनी येत्या तीन महिन्यांत चित्रपट प्रदर्शित करण्याचीही घोषणा केली आहे. यात अनेक बड्या ताऱ्यांचे नवीन चित्रपटही आहेत. तसेच जुने चित्रपट ऑक्टोबरमध्ये काही ठिकाणी पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. यासह प्रादेशिक चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

  • चित्रपटगृहात पुढच्या तीन महिन्यांत रिलीज होणार हे चित्रपट
नोव्हेंबर‘बंटी और बबली2’, ‘इंदू की जवानी’, ‘छलांग’, ‘संदीप और पिंकी फरार’, ’99 सॉन्ग्स’, ‘मिमी’, ‘टेनेंट’
डिसेंबर‘83’, ‘रूही अफजाना’, ‘डेथ ऑन द नाइल’, ‘वंडरवुमेन’, ‘ड्यून’
जानेवारी‘सूर्यवंशी’, ‘आधार’, ‘केजीएफ2’, ‘सरदार ऊधम सिंह’ ‘राम प्रसाद की तेरवीं’, ‘पीटर रैबिट’
  • दिवाळीला होऊ शकते तीन चित्रपटांची टक्कर

दिल्ली सर्किटचे वितरक संजय घई यांनी सांगितले, नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात नवीन चित्रपटांचे संकट नाही. 16 ऑक्टोबरच्या विकेंडमध्ये ‘वॉर’ आणि ‘तान्हाजी’ सारखे चित्रपट पुन्हा रिलीज होतील. ‘छिछोरे’सह या वर्षी 28 फेब्रुवारीपासून आठ महिन्याआधी रिलीज झालेले चित्रपट एकाच दिवशी वेगवेगळ्या शोमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार आहे. जेणे करुन प्रेक्षकांनाही वेगवेगळे चित्रपट पाहायला मिळतील. यापूर्वीदेखील दिवाळीला जुने चित्रपट रिलीज करण्याची परंपरा राहिली आहे. यंदाही तोच पॅटर्न दिसत आहे. ‘सूरज पर मंगल भारी’ तर अधिकृतरित्या दाखवण्यात येत आहे, मात्र ‘बंटी और बबली2’ व भन्साळींचा चित्रपट रिलीज होण्याची दाट शक्यता आहे.

  • एकल पडद्यावर रिलीज होतील ओटीटीवर प्रदर्शित झालेले चित्रपट

दुसरीकडे मल्टिप्लेक्सच्या मालकांसोबत ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘कुली नंबर 1’च्या निर्मात्यांच्या बैठका सुरू आहेत. ते आपले चित्रपट विकेंडच्या जवळपास रिलीज करण्याविषयी चर्चा करत आहेत. मात्र ओटीटीवर रिलीज झाल्यामुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपटगृह मालकांनी घेतला आहे. मात्र एकल पडद्याचे मालिक प्रदर्शित करण्यास तयार आहेत. विशेषकरून ‘लक्ष्मी बॉम्ब’ जो 9 नोव्हेंबर रोजी हॉट स्टारवर रिलीज होणार आहेत. एकल पडद्यावर हा चित्रपट 13 किंवा 14 नोव्हेंबरला रिलीज होऊ शकतो.

  • पडद्यावर रिलीज होतील प्रादेशिक चित्रपट

या मोठ्या चित्रपटांव्यतिरिक्त प्रसिद्ध कलाकारांचे जुने चित्रपटही दाखवले जातील. यात ऋषी कपूर आणि इरफान खानच्या चित्रपटांचा समावेश राहिल. याव्यतिरिक्त तामिळ, बंगाली, तेलगु, मल्याळम अशा प्रादेशिक चित्रपटावर जोर राहिल. या भाषेतील चित्रपट संबंधित राज्य आणि हिंदी प्रदेशातही रिलीज होतील. पंजाबी चित्रपटांची देखील एक यादी तयार करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...