आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्पिरेशन:जे काम मिळाले ते करत गेलो, छोट्या संधींना मोठ्यात बदलत सुपरस्टार बनलो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डफ अँड फेल्प्स इंडियाच्या ‘मोस्ट व्हॅल्यूड सेलिब्रिटी लिस्ट’मध्ये अक्षय सर्वोच्च स्थानी

आमिर खानच्या ‘तारे जमीं पर’मधील ‘ईशान’प्रमाणेच अक्षयकुमारच्या डोळ्यांसमोरही अक्षरे उडत असायची. बालपणी त्यांचा अभ्यासात रस नसल्याने ते शिकू न शकल्याने सातवीत नापास झाले. यावर वडिलांनी नाराज होत त्यांना मारले व ‘तू नक्की काय व्हायचे आहे?’ असे विचारले. तेव्हा अक्षयने ‘मला हिरो व्हायचे आहे’ असे उत्तर दिले. मोठे झाल्यावर अक्षय हिरो तर बनले. पण हा प्रवास सोपा नव्हता. पंजाबातील अमृतसरमध्ये हरि ओम आणि अरुणा भाटिया यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. राजीव असे त्यांचे नामकरण झाले. सामान्य मुलाप्रमाणेच त्यांचे पालनपोषण झाले. तारुण्यात त्यांचे मार्शल आर्ट््सवर प्रेम जडल्याने त्यांनी शिक्षण सोडून बँकॉकचा रस्ता धरत कराटेतील तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. त्यांना आवडीचे म्हणजे मार्शल आर्ट शिक्षकाचे काम मुंबईत मिळाले.

त्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना स्वत:चे पोर्टफोलियो शूट करून मॉडेलिंग करण्यासाठी प्रोत्साहित केले. या पोर्टफोलियोसाठी त्यांनी फोटोग्राफर जयेश सेठसोबत १८ महिने सलग विनामोबदला काम केले. मॉडेलिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांना महिनाभराच्या कमाईइतकी रक्कम मिळाली. याचवेळी अक्षयने याच क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. एका मॉडेलिंग कार्यक्रमासाठी अक्षयला बंगळुरूला जाण्यासाठी सायंकाळी सहाची फ्लाइट पकडायची होती. याची तयारी करत असतानाच अक्षयला फोन आला की, त्यांना सायंकाळची नव्हे तर सकाळी सहाची फ्लाइट घ्यायची आहे, अशावेळी फ्लाइट चुकणे म्हणजे संधी गेल्यासारखेच. त्याच सायंकाळी ते स्टुडिओत निर्माते प्रमोद चक्रवर्ती यांना भेटले. त्यांना अक्षयचे फोटो इतके आवडले की, त्यांनी अक्षयची आपल्या आगामी चित्रपटासाठी हिरो म्हणून निवड केली.

सुरुवातीचे चित्रपट न चालल्याने काम मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. मग १९९२ मध्ये ‘खिलाडी’ मिळाला. हा चित्रपट इतका गाजला की, अक्षयच्या नावासोबत ‘खिलाडी’ नाव जोडले गेले. यानंतर अक्षयला चित्रपट तर मिळतच गेले. परंतु अजूनही ते ए-लिस्ट निर्मात्यांपासून दूर होते.

प्रियदर्शनच्या ‘हेरा फेरी’ने हा दुवा सांधला. नामवंत निर्माता असो किंवा छोटी भूमिका, अक्षयने कोणत्याच कामाला नकार दर्शवला नाही. यात चांगला व वाईट काळ आला व त्यातच त्यांचे १४ चित्रपट आपटले. आता आपले करिअर संपले असे समजत त्यांनी कॅनडाचे नागरिकत्व पत्करले. यात मात्र त्यांचा १५ वा चित्रपट हिट गेला. त्यामुळे आता अक्षयला दुसरे काही करण्याचा विचार आला नाही. मागील तीन दशकांपासून ताे इंडस्ट्रीत सर्वोच्चस्थानी आहे.

अक्षयचे सरळ जीवन
पहाटे साडेचारला उठून व्यायाम करतात आणि नंतर एक तास पोहतात. मुलांना शाळेत सोडून आपल्या शूटिंगला जातात. आठ तासांच्या शूटिंगनंतर रात्री ९.30 वाजता घरी झोपतात.

- 'मोठी संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा छोट्या संधी मिळाल्यावर काम कराल. ज्याप्रमाणे पैसा पैशाला ओढतो, त्याप्रमाणेच छोटी कामे मोठ्याला खेचून आणतात.'

- 'सुरुवातीच्या दिवसात मी चित्रपटात काम पैशासाठी करायचो. पण आता मला केवळ अभिनय आवडत असल्याने करतो.'

बातम्या आणखी आहेत...