आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर तुम्ही 'फास्ट अँड फ्युरियस' सिरीजचे चाहते असाल तर ही बातमी तुम्हाला मालामाल करु शकते. या सिरीजचे जगभरात लाखो चाहते आहेत. आता एका वेबसाइटने या चित्रपटाबाबत एक अनोखी ऑफर आणली आहे. ही ऑफर तुम्ही नाकारुच शकत नाही. यासाठी तुम्हाला काय करायचे तर फक्त फास्ट अँड फ्युरियस चित्रपटाचे सर्व 10 भाग बघायचे आहेत. या मोबदल्यात ही वेबसाइट तुम्हाला 1 हजार डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार तब्बल 81,000 रुपये देणार आहे.
दोन आठवड्यांत बघावे लागतील 10 भाग
'फास्ट अँड फ्युरियस' या चित्रपटाचे 10 भाग बघण्यासाठी स्पर्धकाला दोन आठवड्यांचा कालावधी दिला जाणार आहे. फायनान्स बज या वेबसाइटने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही एक फायनान्स वेबसाइट असून त्यांनी या ऑफरला 'फास्ट अँड फ्युरियस क्लेम अॅडजस्टर' असे नाव दिले आहे. फायनान्स बजने दिलेल्या माहितीनुसार, 'फास्ट अँड फ्युरियस क्लेम अॅडजस्टर'अंतर्गत पहिल्या भागापासून ते दहाव्या भागापर्यंत त्यात झालेल्या अपघातांची संख्या कमी झाली की ती वाढली, याची माहिती चित्रपट बघणाऱ्याला द्यावी लागणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला प्रत्येक कार अपघाताचा सखोल अभ्यास करावा लागेल आणि नुकसान किती प्रमाणात झाले आहे आणि कोणत्या कारचा समावेश आहे याची नोंद घ्यावी लागेल.'
फायनान्स बजने दिलेल्या माहितीनुसार, "फास्ट एक्सच्या आगामी भाग 19 मे रोजी रिलीज होण्याआधी आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत जो फास्ट अँड फ्यूरियस फ्रँचायझीचे सर्व 10 चित्रपट पाहू शकेल. यासह स्पर्धकाला नवीन फास्ट एक्स चित्रपट थिएटरमध्ये पाहावा लागेल."
मात्र, यासाठी अट म्हणजे फक्त अमेरिकन नागरिकच या स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज 19 मे पासून सुरू होतील आणि विजेत्याची घोषणा 26 मे पर्यंत केली जाईल. आगामी फास्ट एक्समध्ये विन डिजेल, ड्वेन जॉनसन, जेसन स्टेटहेम, टेरिस गिब्सन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.