आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:'पुष्पा'ची 'श्रीवल्ली' रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यावर्षी लग्न करणार? दोघांच्या अफेअरची सध्या सुरु आहे जोरदार चर्चा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बॉय'मध्ये दिसणार आहे

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. आता दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही आणि मौन बाळगले आहे.

रश्मिका-विजय सध्या मुंबईत राहत आहेत
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. ज्यासाठी दोघेही सध्या मुंबईत वास्तव्याला आहेत. सध्या विजय देवरकोंडा मुंबईत त्याचा डेब्यू चित्रपट 'लिगर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडेही दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने नुकतेच मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. विजय-रश्मिका दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला गेले होते. दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे.

दोघांनी 2 चित्रपटात एकत्र काम केले
रश्मिका आणि विजयने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांची जोडी खूप आवडली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअर आणि डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या. रश्मिका मंदाना सध्या तिचा बॉलिवूड डेब्यू 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

लग्नाबाबत रश्मिका म्हणाली...
अलीकडेच 25 वर्षीय रश्मिकाने एका मुलाखतीत लग्नाविषयीचे तिचे विचार सांगितले होते. रश्मिकाने सांगितले होते की, तिने आतापर्यंत तिच्या लग्नाचा विचार केलेला नाही. पण जोडीदार असा असावा, ज्याच्यासोबत कम्फर्टेबल आहे, असे वाटायला हवे.

रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बॉय'मध्ये दिसणार आहे
'मिशन मजनू' व्यतिरिक्त रश्मिका लवकरच 'गुड बॉय'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिकाशिवाय अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. अलीकडेच रश्मिका अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटात 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...