आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहेत आर्यनची वकिली करणारे मानेशिंदे?:सलमान खान, संजय दत्त, रिया चक्रवर्तीनंतर आता ड्रग्ज प्रकरणी न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणार वकील सतीश मानेशिंदे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहेत सतीश मानेशिंदे?

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी मुंबईत मोठी कारवाई केली. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. यावेळी या रेव्ह पार्टीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे यांना नियुक्त करण्यात आले आहे. एनसीबीने या प्रकरणात हाती लागलेले पुरावे सादर करत आर्यनच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी दिली होती. या प्रकरणात सोमवारी आर्यनला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

वकील सतीश मनेशिंदे यांनी न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडत आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत. त्याला फक्त व्हॉट्स अॅप चॅट्सच्या आधारावर अटक करण्यात आली आहे, असे म्हटले होते. मानेशिंदे आज न्यायालयासमोर आर्यनसाठी जामीनाचा अर्ज करणार आहेत.

विशेष म्हणजे सतीश मानेशिंदे यांनी ड्रग्ज प्रकरणात या आधीही बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची बाजू न्यायालयात मांडली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्तीची बाजू मांडली होती. तसेच सलमान खान, संजय दत्त यांचाही खटला त्यांना लढला होता. प्रसिद्ध वकील सतिश मानेशिंदे यांच्याविषयी जाणून घेऊया...

कोण आहेत सतीश मानेशिंदे?
नाव :
सतीश मानेशिंदे
व्यवसाय : वकील
जन्म : धारवाड, कर्नाटक
शिक्षण : धारवाड येथून एलएल.बी.
कौशल्य : गुन्हे क्षेत्रातील वकील

भारतातील गुन्हे क्षेत्राचे ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांचे ज्युनिअर राहिलेले सतीश मानेशिंदे हे एक फार मोठी असामी बनले आहेत; पण सन 1993 मध्ये मुंबईत आलेल्या मानेशिंदेंकडे खिशात असलेल्या काही रुपयांपेक्षा जास्त काहीही नव्हते. अशा स्थितीत मुंबईसारख्या महानगरात पाय रोवणे तेव्हा सोपे नव्हते. खूप संघर्ष व अडचणींनंतर त्यांना भारतातील ख्यातनाम वकील जेठमलानी यांचे साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत राहून सतीश यांनी गुन्हेगारी प्रकरणांच्या युक्तिवादातील नवनवीन डावपेच आत्मसात केले व त्यासोबतच मोठय़ा असामींसोबत संबंध आणि संपर्क तयार केले. 1990 मध्ये जेठमलानींना टाडा प्रकरणात संजय दत्तला जामीन मिळवता आला नव्हता, त्यामुळे 1996 मध्ये मुंबई स्फोटांच्या सुनावणीदरम्यान दत्त कुटुंबाने सतीश मानेशिंदेंना संपर्क केला. उल्लेखनीय म्हणजे सतीश मानेशिंदेंनी संजय दत्तला जामीन मिळवून देऊन त्यांच्या कौशल्याने बॉलिवूडवर छाप पाडली.

या प्रकरणानंतर, अभिनेता सलमान खानवर दारू पिऊन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचे प्रकरण चर्चेत आले तेव्हाही सतीश यांनी सलमान खानला जामीन मिळवून दिला. याप्रकारे सुरू झालेला त्यांचा सोनेरी प्रवास आजही तसाच सुरू आहे.

रिया चक्रवर्तीचाही लढवला खटला, फीमुळे आले होते चर्चेत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेदेखील प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांना नियुक्त केले. प्रति हिअरिंग त्यांची फी 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. यावरुन ते चर्चेत आले होते. सतीश मानशिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वत: एका मीडिया हाऊसशी त्यांच्या फीसंदर्भात चर्चा केली होती.

झूम टीव्हीशी बोलताना सतीश मानशिंदे म्हणाले होते, 'दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे माझ्या फीचा अंदाज 10 लाख रुपये लावला जातोय.. परंतु आपण 10 वर्षे जुना लेख का पाहात आहात? तसं पाहता, मग माझी सध्याची फी खूप जास्त असेल.'

ते पुढे म्हणाले होते, 'माझ्या क्लायंटकडून मी जी काही फी घेतो त्याच्याशी कुणाचाही काहीही संबंध नाही. जर इनकम टॅक्सला माझी फी जाणून घ्यायची असेल, तर मी त्यांना उत्तर देईल. माझ्या आणि माझ्या क्लायंटमधील खूप वैयक्तिक असलेली कोणतीही चर्चा मला नको आहे.'

बातम्या आणखी आहेत...