आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविपुल शाह यांची निर्मिती असलेल्या 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनाआधीपासूनच निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. अनेक संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. तर काहींनी चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. काही राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला, तर काहींनी मात्र त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली. आधी तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. आता त्या पाठोपाठ ममता बॅनर्जी सरकारनेही चित्रपटावर बंदी आणली आहे. प. बंगालमध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्या निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेत या चित्रपटावर आपला संताप व्यक्त केला. ही कथा रचलेली असल्याचे सांगून त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
तामिळनाडूही चित्रपटावर बंदी
तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने रविवारी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. या चित्रपटाला विरोध आणि प्रदर्शने होत असल्याचे कारण देत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
तामिळनाडू थिएटर्स अँड मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम सुब्रमण्यम म्हणाले की, 'हा चित्रपट भारताच्या काही मल्टिप्लेक्समध्ये, विशेषतः पीव्हीआरमध्ये दाखवला जात होता. चित्रपटात प्रसिद्ध स्टार नसल्याने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय स्थानिक मल्टिप्लेक्सने आधीच घेतला होता. कोइम्बतूरमध्ये आतापर्यंत फक्त दोनच शो झाले आहेत - एक शुक्रवारी आणि दुसरा शनिवारी. पण या शोलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहूनच चित्रपटगृहाच्या मालकांनी हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.'
5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 35.75 कोटींची कमाई केली आहे. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे.
चित्रपटाला पाठिंबा:'द केरला स्टोरी'ला विरोध करणाऱ्यांना शबाना आझमींनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या...
'द केरला स्टोरी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. तर काहींनी मात्र या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी 'द केरला स्टोरी' समर्थनार्थ एक ट्वीट केले आहे. त्यांनी चित्रपटावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटावर जशी बंदीची मागणी अयोग्य होती तशीच या चित्रपटाबाबत केली जाणारी मागणी अयोग्य आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. वाचा सविस्तर...
खंत:महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’चे राजकारण्यांकडून मोफत शो, केदार शिंदे म्हणाले - 'नेत्यांना शाहीर साबळे कोण, हे तरी माहिती असेल का?'
'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर त्यांची लेक सना शिंदे हिने या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे हिंदीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.