आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राजच्या विरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली असल्याची माहितीही उघड झाली आहे.
राज कुंद्रा आणि ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या त्याच्या भावाने केनरिन नावाची कंपनी स्थापन केली आहे. चित्रपटांचे व्हिडिओ भारतात शूट केले गेले होते आणि वी ट्रान्सफर (ही एक फाईल ट्रान्सफर सर्व्हिस आहे) च्या माध्यमातून केनरिनला पाठवले गेले होते. ही कंपनी राज कुंद्रानेच स्थापन केली असून त्याची नोंदणी परदेशात केली, जेणेकरुन भारताच्या सायबर लॉपासून स्वतःचा बचाव करता येईल.
डील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून व्हायच्या
राजच्या अटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत, ज्यावरून अश्लिल चित्रपट बनवण्याच्या धंद्यातून राज कुंद्राने बक्कळ कमाई केली असल्याचे उघड होत आहे. व्हायरल व्हॉट्सअॅप चॅटवर H अकाउंट्स नावाचा एक ग्रुप दिसत आहे, ज्याचा अॅडमिन राज आहे. या ग्रुपवर राज त्याचे नातेवाईक आणि पॉर्न मूव्ही मेकर कंपनी प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन प्रदीप बक्षी यांच्याशी पैशांच्या व्यवहार आणि कंटेंट पोस्टिंगविषयी चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.
5 जणांच्या या ग्रुपमध्ये प्रदीप आणि राज यांच्यात व्यवसायात कमी जास्त होणारी कमाई, मार्केटिंगची रणनीती, विक्रीत वाढ, पोर्न अभिनेत्रींना कमाई झाली की नाही, याबद्दल खुली चर्चा झाल्याचे दिसत आहे. अश्लील चित्रपटांचा व्यवसायात खूप नफा व्हायचा आणि या भरभराटीच्या धंद्यामुळे राज खूप खूष होता हे चॅटवरुन दिसून येते. बिझनेस डील्ससुद्धा राज या ग्रुपवरील चर्चेनंतर फायनल करत होता. राजचा माजी पीए उमेश कामत हा भारतातील केनरिन प्रॉडक्शन कंपनीचा प्रतिनिधी होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.