आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

47 वर्षांची झाली ट्विंकल:जेव्हा अक्षय कुमारने ट्विंकलला घातली होती लग्नाची मागणी तेव्हा आई डिंपलने ठेवली होती एक अट, मग दिली लग्नासाठी परवानगी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंट्रेस्टिंग आहे अक्षय-ट्विंकलची लव्ह स्टोरी

ट्विंकल खन्नाने वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. सुपरस्टार अक्षय कुमारसोबतची तिची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. असे म्हटले जाते, की ट्विंकलचा 'मेला' हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे 'मेला' हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. जर 'मेला' हा चित्रपट त्यावर्षी हिट ठरला असता, तर कदाचित आज अक्षय-ट्विंकल पती पत्नी नसते.

लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते दोघे

अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती. ट्विंकलने काही दिवसांपूर्वी एक शोमध्ये अक्षय आणि तिच्या लग्नाबाबत एक मोठा आणि तितकाच धक्कादायक खुलासा केला होता. तिने सांगितल्यानुसार, तिची आई डिंपल कपाडिया अक्षयला गे समजत होत्या. डिंपल यांना त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने अक्षय गे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेक केले. डिंपल यांनी अक्षय-ट्विंकलच्या लग्नाअगोदर त्यांना एक वर्ष लिव-इनमध्ये राहण्याची अट घातली होती. जर दोघांना त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नसेल तर लग्नाची परवानगी देण्यात येईल, असे डिंपल यांनी दोघांना सांगितले होते. अशाप्रकारे दोघे एक वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले आणि त्यानंतर लग्न केले. ट्विंकल खन्नाने कॉफी विथ करणमध्ये अनेक खुलासे केले होते. ट्विंकल खन्नाने या शोमध्ये सांगितले होते की, मी एका मोठ्या नात्यातून बाहेर आले होते आणि पुन्हा कोणत्याही कमिटमेंटमध्ये जाण्याच्या मूडमध्ये नव्हते. मला वाटले हे नाते केवळ 15 दिवस टिकेल. आज लग्नाला 15 वर्षे (2016 वर्षानुसार) झाले आहेत.

मुलीच्या जन्माच्या वेळी ट्विंकलने पुन्हा अक्षयसमोर ठेवली होती एक अट

17 जानेवारी 2000 मध्ये अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत. 2002 मध्ये त्यांचा मुलगा आरवचा जन्म झाला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये त्यांची मुलगी निताराचा जन्म झाला.

2016 मध्ये कॉफी विथ करणच्या पाचव्या सीझनमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना पाहुणे म्हणून आले होते. या शोमध्ये ट्विंकल खन्नाने अक्षयसमोर कोणती अट ठेवली होती याचा खुलासा केला होता. याबाबत ट्विंकल म्हणाली होती, मी अक्षयला सरळ सांगितले की जोपर्यंत तो सेन्सिबल आणि चांगले सिनेमे करणार नाही तोपर्यंत मी दुसऱ्या बाळाचा विचार करणार नाही. अक्षय कुमारने यावर उत्तर देताना म्हटले की, तुम्ही समजू शकता की माझे काय झाले असेल.

रोज रात्री रमी खेळतात ट्विंकल-अक्षय

अक्षय कुमार अशा कलाकारांपैकी एक आहे जो उशीरात्रीपर्यंत काम करत नाही. अक्षय रात्री 9 वाजता झोपतो आणि भल्या पहाटे 4 वाजता उठतो. त्याला त्याच्या या लाइफस्टाइलमध्ये ट्विंकल पूर्ण साथ देते. ट्विंकलने सांगितले होते, की अक्षय आणि ती रोज रात्री झोपण्यापूर्वी रमी खेळतात.

बातम्या आणखी आहेत...