आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअ‍ॅक्शन:रणबीर कपूरच्या भूतकाळावर आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली - 'मीदेखील रिलेशनशिपमध्ये होते, प्रत्येकाचा भूतकाळ असतो'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 17 एप्रिलला लग्न करणार हे कपल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. आलियाने काही दिवसांपूर्वी तिचा प्रियकर रणबीरच्या भूतकाळातील नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मुलाखतीत जेव्हा आलियाला रणबीरच्या भूतकाळाबद्दल विचारण्यात आले तेव्हा आलियाने तिच्या भूतकाळातील नातेसंबंधांकडे इशारा करत म्हटले सांगितले की, तिचाही एक भूतकाळ आहे आणि तो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो.

भूतकाळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असतो
रणबीरच्या भूतकाळाबद्दल बोलताना आलिया म्हणाली, "याने मला काही फरक पडत नाही, तो कोणाच्या तरी आयुष्याचा भाग आहे आणि मला त्याची पर्वा नाही. माझा देखील भूतकाळ आहे." लग्नाबाबत बोलताना आलिया म्हणाली, "मी लग्नासाठी खूप लहान आहे आणि आयुष्यात बरंच काही घडतंय."

रणबीर खूप छान व्यक्ती आहे
आलिया पुढे रणबीरबद्दल बोलताना म्हणाली की, तो खूप चांगला माणूस आहे. ती सांगते, "तो अतिशय साधा आहे. एक अभिनेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, तो माझ्यापेक्षा खूप चांगला आहे."

चाहत्यांनी लग्नाबद्दल विचारले प्रश्न
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 'ब्रह्मास्त्र'च्या मोशन पोस्टर लाँच इव्हेंटमध्ये एका चाहत्याने रणबीरला विचारले होते, "तू आलियाशी किंवा इतर कोणाशी कधी लग्न करणार आहेस?" त्यावर रणबीरने उत्तर दिले होते की, "गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी खूप लोकांचे लग्न पाहिले आहे, नाही का... मला वाटते की आपण ते बघूनच आनंदी व्हायला हवे." मात्र यानंतर आलियाकडे वळत तो म्हणाला होता, "आपण कधी करणार?" त्यावर आलियाने लाजत उत्तर दिले होते की, "तू मला का विचारतोस?"

17 एप्रिलला लग्न करणार हे कपल
गेल्या आठवड्यापासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघांचे लग्न याच महिन्यात एप्रिलमध्ये होणार असून 13 ते 17 एप्रिल दरम्यान लग्नविधी होणार आहेत. 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलिया पहिल्यांदा एकत्र दिसले होते.

दोघेही 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार
अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आलिया अलीकडे एसएस राजामौलींच्या 'RRR' या चित्रपटात अजय देवगण, राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...