आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’:...जेव्हा अलका याज्ञिक आणि हिमेश रेशमिया यांनी 22 वर्षांनंतर 'ओढली चुनरिया' गाण्याची केली पुनर्निर्मिती 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ 18 जुलैपासून टेलिव्हिजनवर करणार मेगा कमबॅक

लॉकडाऊन हळूहळू उठत चालला असून देशभरातील लोक नवीन नॉर्मलमध्ये प्रवेश करत आहेत. झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ सीजन 8 पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून हिमेश रेशमिया आणि जावेद अली आता अलका याज्ञिक यांच्यासोबत परीक्षकांच्या रूपात दिसून येणार आहेत. लोकप्रिय अभिनेता आणि सूत्रसंचालक मनीष पॉल सूत्रधार म्हणून या शो चे काम पाहणे सुरू ठेवणार आहे. लॉकडाऊन नंतरचा पहिला एपिसोड खास आहे कारण तो भारतातील अनसंग हीरोज कोविड वॉरियर्सना आदरांजली अर्पण करेल.

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चा आगामी एपिसोड ह्या कठीण काळातील डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर प्रकाश टाकेल आणि त्यांच्या प्रेरणादायी कथा दर्शवेल. एवढेच नाही तर या शोच्या दरम्यान तीनही परीक्षक प्रेक्षकांसमोर काही असाधारण गोष्टी उघड करतील.

ह्या खास एपिसोडमध्ये स्पर्धक अनन्या शर्मा आणि सौम्या शर्मा या अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचे चित्रपट ‘प्यार किया तो डरना क्या’मधील अप्रतिम गाणे ओढली चुनरिया तेरे नाम की गाताना दिसतील. या गाण्याची चाल हिमेश रेशमिया यांची असून तो हिमेश यांचा पहिला-वहिला प्रोजेक्ट होता. मात्र, या परफॉर्मन्सनंतर अलकाजींनी जे सांगितले ते ऐकून सगळेच चकित झाले. एक काळ असा होता जेव्हा त्या हिमेश पासून लांबच राहत होत्या.

हिमेश रेशमिया कोण आहे हे अलकाजीना ठाऊक नसतानाच्या काळाबद्दल त्या म्हणाल्या, “हिमेशसोबत ते माझे पहिले गाणे होते काही 22 वर्षांपूर्वी आणि खरंतर मला त्याच्याबद्दल फारसे काहीच ठाऊक नव्हते. माझी डायरी अनेक चित्रपटांसाठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या तारखांनी भरली होती. मला कॉल आला आणि सांगण्यात आले की एक नवीन मुलगा आहे ज्याला माझ्यासोबत गाणे रेकॉर्ड करायचे आहे. पण माझे कॅलेंडर फूल होते त्यामुळे मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही. मग विपिन रेशमिया यांनी मला कॉल केला आणि ते म्हणाले की त्यांचा मुलगा माझ्यासाठी प्रथमच गाणे बनवत आहे आणि तो माझा अतिशय मोठा चाहता आहे तेव्हा मी हिमेशला भेटले आणि जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हाच मला खात्री पटली होती की हे गाणे चार्टवर टॉपवर असेल.”

हिमेशनीही ही आठवण काढली आणि आपल्या वडिलांचा आपल्यावर आणि आपल्या करिअरवर किती प्रभाव होता याबद्दल हळवे होऊन ते म्हणाले, “माझे नाव आहे पण त्या मागचा माणूस तो आहे. मी आजही त्यांची परवानगी घेतो.” यानंतर अलका याज्ञिक आणि हिमेश रेशमिया यांनी हे चार्ट बस्टर गाणे एकत्र गायले आणि माहोल उजळवला.

अतिशय गुणी अशा या लिटल चॅम्प्सतर्फे कोविड वॉरियरसाठीचे सादर करण्यात आलेले हे स्पेशल परफॉर्मन्स प्रेक्षकांना निश्चितपणे आवडतील. गुरकीरतने झूम बराबर झूमवर परफॉर्म केले तर हिमेश रेशमिया यांनी तुम पर हम है अटके यारा हे गीत सादर केले. ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या आगामी भागामध्ये प्रेक्षकांसाठी खूप मेलोडीज, आठवणी आणि सरप्राईजेस आहेत.