आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी दीक्षितचा 54 वा वाढदिवस:'हे' कारण देत प्रसिद्ध गायक सुरेश वाडकरांनी नाकारला होता माधुरी दीक्षितसोबत लग्नाचा प्रस्ताव, नंतर डॉक्टरसोबत माधुरीने थाटला संसार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधुरीने 'अबोध'द्वारे केले होते चित्रपटसृष्टीत पदार्पण

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित 54 वर्षांची झाली आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईमध्ये तिचा जन्म झाला. ती गेल्या 35 वर्षांहून अधिक काळापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. परंतू तुम्हाला माहिती आहे का, की चित्रपट करिअरच्या सुरुवातीलाच माधुरीच्या लग्नाची बोलणी सुरु झाली होती. या काळात माधुरी दीक्षितचे स्थळ लग्नासाठी प्रसिध्द सिंगर सुरेश वाडकर यांच्याकडे पाठवण्यात आले होते. त्यावेळी सुरेश वाडकर यांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत फेटाळला होता.

चित्रपटात करिअर करायला होता आई वडिलांचा विरोध
माधुरीने चित्रपटसृष्टीत करिअर करू नये अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुरेश वाडकर यांच्यावर येऊन तो शोध थांबला. माधुरी सुरेश वाडकर यांच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान आहे. सुरेश यांनी लग्नाला नकार दिल्याने माधुरीच्या आईवडिलांची चिंता अधिकच वाढली होती. त्यांना वाटू लागले होते की, जर माधुरीने चित्रपटांत जास्त काम केले तर तिच्या लग्नात अडचणी निर्माण होऊ शकतील. पण माधुरीने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

'अबोध'द्वारे केले होते चित्रपटसृष्टीत पदार्पण
माधुरीने 1984 मध्ये 'अबोध' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय तिने 'तेजाब', 'राम लखन', 'परिंदा', 'त्रिदेव ', 'किशन-कन्हैया', 'प्रहार', फिल्म 'दिल', 'दिल तो पागल', 'पुकार', 'लज्जा', 'देवदास', 'आजा नचले', 'गुलाब गँग','कलंक'सह आपल्या फिल्मी करिअरमध्ये 80 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.

लंडनच्या डॉक्टरबरोबर झाले माधुरीचे लग्न
7 ऑक्टोबर 1999 मध्ये माधुरीने लंडनमधील डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यांना एरीन आणि रेयान ही दोन मुले आहेत. माधुरी आणि नेने यांचे अरेंज मॅरेज आहे.

माधुरी लॉस एंजिलिसला तिच्या भावाला भेटायला गेली असताना तिथे तिची भेट श्रीराम नेनेंशी झाली. तेव्हा श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती. यानंतर त्यांच्या भेटी- गाठी होत गेल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...