आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षांचे झाले बोनी कपूर:विवाहित असूनदेखील श्रीदेवीच्या प्रेमात आकंठ बु़डाले होते बोनी, पहिल्या पत्नीला म्हटले होते -  मी तिच्याशिवाय जगू शकत नाही

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 वर्षे निभावली होती पहिली पत्नी मोनाची साथ

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांनी 11 नोव्हेंबर रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेमांपेक्षा ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. वयाच्या 28 व्या वर्षी बोनी कपूर यांनी मोना शौरीसोबत लग्न केले होते. विवाहित आणि दोन मुलांचे वडील असूनदेखील बोनी यांचा जीव अभिनेत्री श्रीदेवीवर जडला होता. पहिल्या पत्नीला बाजुला सारत त्यांनी श्रीदेवीचा हात पकडला.

13 वर्षे निभावली होती पहिली पत्नी मोनाची साथ
मोना शौरी 19 वर्षांच्या असताना त्यांचे त्यांच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठ्या असलेल्या बोनी कपूर यांच्यासोबत लग्न झाले होते. दोघांचे अरेंज मॅरेज होते. दोघेही या लग्नाने आनंदी होती. मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुलाच्या जन्मापर्यंत सर्वकाही नीट सुरु होते. मात्र दोघांच्या सुखी वैवाहिक आयुष्यात अचानक श्रीदेवीची एन्ट्री झाली आणि बोनी कपूर पहिली पत्नी मोनापासून कायदेशीररित्या विभक्त झाले. 13 वर्षे दोघांचे लग्न टिकले होते. 1996 साली बोनी मोना यांच्यापासून विभक्त झाले आणि श्रीदेवीसोबत दुसरा संसार थाटला. श्रीदेवीशिवाय जगू शकत नाही, असे त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सांगितले होते.

श्रीदेवीवर एकतर्फी प्रेम करत होते बोनी कपूर
बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या लव्हस्टोरीमध्ये अनेक चढ उतार आले आहेत. सुरुवातीला हे एकतर्फी प्रेम होते. या प्रेमाची सुरुवात 'मि. इंडिया' सिनेमापासून झाली असली तरी बोनी 1970च्या दशकात श्रीदेवी तामिळ सिनेमांत काम करत होत्या, तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले होते.

श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईला गेले, परंतु नाही झाली भेट
बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईलासुध्दा गेले होते. परंतु श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याचवेळी त्यांचा 'सोलहवा साल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून बोनी प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले, की ते निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार. एकेदिवशी सिनेमाच्या सेटवर बोनी श्रीदेवीची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण श्रीदेवी यांनी त्यांची काम त्यांची आई पाहते. जेव्हा ते होणा-या सासूला भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, श्रीदेवी 'मि. इंडिया' सिनेमात काम करेल, परंतु तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. श्रीदेवीच्या आईचा आनंद गगनात मावेना. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची संधी मिळाली. त्यांनी श्रीदेवीसाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. परंतु अजूनही त्यांचे प्रेम एकतर्फीच होतेच. बोनी यांनी श्रीदेवीसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. एकदा बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते.

आईच्या आजारपणामुळे संपला होता दूरावा
श्रीदेवीच्या आई आजारी पडल्यानंतर या लव्हस्टोरी महत्वाचे वळण आले. त्यांच्या आईवर अमेरिकेत उपचार सुरु होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मानसिक, भावनिक आणि अर्थिक रुपात मदत केली होती. त्यांच्या आईचे कर्जसुध्दा बोनी यांनी फेडले होते. श्रीदेवी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झाली आणि बोनीच्या प्रेमाला होकार दिला.

श्रीदेवी यांनी 1996 साली तिच्या फॅन्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आश्चर्याचा धक्का देत त्यांच्यापेक्षा वयाने आठ वर्षे मोठ्या बोनी कपूरसोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. 2018 मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बोनी यांना मोठा धक्का बसला होता. आजही ते त्यांची आठवण काढून भावूक होतात.

बातम्या आणखी आहेत...