आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:अखेरच्या काळात रस्त्यावर भीक मागताना दिसले होते रेखाचे सौंदर्य आपल्या कॅमे-यात कैद करणारे जगदीश माळी, अभिनेत्री अंतरा माळीचे होते वडील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 मध्ये जगदीश माळी मुंबईतील वर्सोवा परिसरात भीक मागताना आढळले होते.

70 ते 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर जगदीश माळी यांची आज बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. 18 जानेवारी 1954 रोजी त्यांचा जन्म झाला होता. ते बॉलिवूड अभिनेत्री अंतरा माळीचे वडील होते. 13 मे 2013 रोजी त्यांचे निधन झाले होते.

कॅमे-यात कैद केले होते रेखाचे सौंदर्य

माळी यांचे बालपणी अभ्यास मन रमत नव्हते. प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायची त्यांचे स्वप्न होते. जगदीश यांना 80 आणि 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून ओळखले जाते. 1980 च्या आसपास त्यांनी सिनेब्लिट्ज नावाच्या बॉलिवूड मॅगझिनसाठी काम केले होते. त्यांना अभिनेत्री रेखाची सुंदरता आपल्या कॅमे-यातून अधिक खुबीने खुलवणारे फोटोग्राफर म्हणून ओळखले जायचे.

जवळजवळ 10 वर्षे त्यांनी रेखा यांचे फोटो काढले होते. माळी यांनी क्लिक केलेले रेखाचे फोटो आजही सर्वोत्कृष्ट मानले जातात. याशिवाय त्यांनी मनीषा कोइराला, इरफान खान, अनुपम खेर, शबाना आझमी या कलाकारांचेही फोटो क्लिक केले होते.

भीक मागताना आढळले होते जगदीश माळी
2013 मध्ये जगदीश माळी मुंबईतील वर्सोवा परिसरात भीक मागताना आढळले होते. ते फाटक्या-मळलेल्या कपड्यांत वर्सोवा रोडवर दिसले होते. ‘बिग बॉस सीझन 6’ या कार्यक्रमात झळकलेली मिंक बरार आपल्या भावासोबत वर्सोवाच्या रोडवर बसलेल्या भिका-यांना घोंगड्या दान करत होती. त्यावेळी तिची नजर जगदीश माळी यांच्यावर गेली. मिंकला जगदीश भिका-यांच्या रांगेत उभे दिसले. जगदीश यांना ओळखण्यात तिला जास्त वेळ लागला नाही. मिंक आणि तिच्या भावाने जगदीश माळी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

मिंकने दिलेल्या माहितीनुसार, जगदीश माळी खूपच डिस्टर्ब दिसले होते. मिंकने त्यांना ‘तुम्हाला कुठे जायचंय?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी माझ्या स्टुडिओत जायचे आहे असे उत्तर दिले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगदीश यांनी काही वर्षापूर्वीच आपला स्टुडिओ विकून टाकला होता. मात्र आता त्यांना या गोष्टीचा विसर पडला होता.

सलमानने दिला होता मदतीचा हात
मिंकने सलमान खानला जगदीश माळी यांच्याबद्दल माहिती दिली होती. तेव्हा सलमानने जगदीश यांनी घरी पोहचवण्यासाठी कार पाठवली होती. सोबत मदतीला चार जणांनाही पाठवले. जगदीश माळी एकटेच आरम नगर येथे राहत होते. जगदीश माळी यांच्याबाबत बोलताना सलमान म्हणाला होता की, ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर होते. त्यांच्याकडून फोटो काढून घेण्यासाठी एकेकाळी आम्हालाही संघर्ष करावा लागला होता.

मुलगी अंतरा माळीने हात झटकले होते
जगदीश माळ यांची मुलगी अंतरा माळीला याविषयी कळविण्यात आले होते. मात्र तिने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आपल्याला नुकतंच एक बाळ झालंय आणि त्यामुळे खूप बिझी असल्याचे अंतराने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...