आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण:आर्यन खानला पाठिंबा दिल्याने हृतिक रोशनवर भडकली कंगना रनोट, म्हणाली- 'आता सगळे माफिया पप्पू त्याला पाठिंबा देत आहेत'

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोटने आर्यन खानला पाठिंबा देणा-यांचा समाचार घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित शाहरुख खानचा मुलगा आर्यनला पाठिंबा दिला आहे. हृतिकने आर्यनला या कठीण काळातून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली आहे. हृतिकची पोस्ट समोर आल्यानंतर आता कंगना रनोटने आर्यन खानला पाठिंबा देणा-यांचा समाचार घेतला आहे.

कंगनाने आपल्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करताना लिहिले, 'आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी पुढे येत आहेत. आपण चुका करतो पण आपण त्याचा अभिमान बाळगू नये. मला खात्री आहे की त्याला एक दृष्टीकोन मिळेल आणि त्याच्या कृत्याच्या परिणामांची जाणीव होईल. हे खरे आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा आपण त्याच्याबद्दल गॉसिप करू नये. त्याने जे केले ते चुकीचे नव्हते, याची त्याला जाणीव करुन देणे हा गुन्हा आहे.'

कंगनाची ही पोस्ट समोर येण्यापूर्वी तिचा पुर्वाश्रमीचा प्रियकर आणि अभिनेता हृतिक रोशनने आर्यनला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने आर्यनला या परिस्थितीतून बाहेर पडण्याची शिकवण दिली होती. हृतिकने लिहिले होते, ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो.’ असे म्हणत हृतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे हृतिक म्हणाला, ‘तू आता या परिस्थितीचा सामना करत आहे. तुमच्यामधील एका हिरोला बाहेर आणण्यासाठी या गोष्टी आयुष्यात होणे गरजेचे आहे. पण सावध रहा. कारण या गोष्टी तुझ्यामधील दयाळूपणा, प्रेम अशा अनेक गोष्टींवर परिणाम करतात.’

हृतिक रोनच्या या पोस्टवर त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने प्रतिक्रिया देताना हेच सत्य आहे, असे लिहिले. हृतिकच्या या पोस्टवर काही नेटक-यांनी मात्र ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला ट्रोलदेखील केले आहे.

बातम्या आणखी आहेत...