आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्सा:जेव्हा जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशाने गुंडांना केली होती मारहाण, हे बघून घाबरले होते जॅकी दा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅकी दांनी सांगितले की, जेव्हा पासून आयशाने गुंडांना मारहाण केली तेव्हा पासून मी तिला घाबरतो.

अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी अलीकडेच ‘डान्स दीवाने 3’च्या स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये जॅकी यांनी त्यांच्या पत्नी आयशा श्रॉफबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. या शोचा सूत्रसंचालक राघव जुयालने जॅकी आणि सुनील यांना ‘तुम्ही तुमच्या पत्नीला घाबरता का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना जॅकी आणि सुनील यांनी हो असे उत्तर दिले. इतकेच नाही तर जॅकी दांनी सांगितले की, जेव्हा पासून आयशाने गुंडांना मारहाण केली तेव्हा पासून मी तिला घाबरतो.

जॅकी म्हणाले - मी पहिल्यापासूनच तिला घाबरतो
जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या पत्नीने गुंडांना मारहाण केल्याचा किस्सा यावेळी शेअर केला. ते म्हणाले, ‘माझे नाव केवळ भिडू आहे. मी आयशाला नेहमी घाबरतो. आजच नाही तर पहिल्यापासूनच. ती माझ्यासमोर नेपियन्स रस्त्यावर गुडांना मारहाण करत होती. तेही मित्रांसाठी. माझे आणि एका मित्राचे भांडण झाले होते. तेव्हा तेथे काही गुंडे आम्हाला मारण्यासाठी आले. तेव्हा तिने माझ्यासमोर त्या गुडांना मारले. तेव्हापासून मी तिला घाबरतो.’

वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदा जॅकी श्रॉफ यांना भेटली होती आयशा
आयशा 13 वर्षांची असताना पहिल्यांदा जॅकी श्रॉफ यांना भेटली होती. दोघांनी 1987 मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. टायगर आणि कृष्णा श्रॉफ. जॅकी अलीकडचे राधे : योर मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटात सलमान खान, दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबत झळकले होते. त्यांचा आगामी चित्रपट सुर्यवंशी हा असून यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...