आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:जेव्हा करण जोहरने अनुष्का शर्माला म्हटले होते - 'देश की बहू', सोशल मीडियावर जुन्हा व्हिडिओ होतोय व्हायरल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काने 2017 मध्ये क्रिकेटर विराट कोहलीशी केले होते लग्न

करण जोहरने आणि अनुष्का शर्मा यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोमधील आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांनी खास पाहुणे म्हणून या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने अनुष्का शर्माची खूप खिल्ली उडवली होती. त्याने गमतीगमतीमध्ये अनुष्काला 'देश की बहू' म्हटले होते. विशेष म्हणजे त्यावेळी अनुष्का शर्माचे लग्न किक्रेटपटू विराट कोहलीसोबत झाले नव्हते.

करण म्हणाला होता - अनुष्का आता काही म्हणू शकत नाही कारण ती 'देशाची सून' आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत करणने अनुष्का आणि कतरिना शाहरुखच्या एका चित्रपटातील एका गाण्याच्या ओळी सांगून त्या चित्रपटाचे नाव विचारले होते. 'बहकी हैं निगाहें और बिखरे हैं बाल' अशा त्या गाण्याच्या ओळी होत्या. अनुष्काने पूर्ण गाणे गायले पण शेवटी कतरिनाने चित्रपटाचे नाव 'कोई मिल गया' आहे हे सांगितले. तर उत्तर होते 'कुछ कुछ होता है.'

त्यानंतर करणने आणखी एक प्रश्न विचारला आणि कतरिनापूर्वीच प्रश्नाचे उत्तर मात्र अनुष्काने दिले. त्यावर कतरिनाने म्हटले की, तिला बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यावर अनुष्कानं 'मैंने मारा मौके पर चौका' असा डायलॉग मारला. ज्यावर करणने अनुष्काची खिल्ली उडवत म्हटले, 'एवढी मोठी झाली माझी मुलगी. क्रिकेटचे जोक्स मारायला लागली. तू तर देशाची सून आहेस. आम्ही काहीच बोलू शकत नाही.'

अनुष्काने 2017 मध्ये क्रिकेटर विराट कोहलीशी केले होते लग्न
अनुष्काने 2017 मध्ये इटलीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केले होते. याचवर्षी हे दोघे एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत. 'वामिका' असे त्यांच्या लेकीचे नाव आहे. अनुष्काच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे ती शेवटची 2018 मध्ये रिलीज झालेल्या आनंद एल राय यांच्या 'झिरो'मध्ये कतरिना कैफ आणि शाहरुख खानसोबत झळकली होती. निर्माती म्हणून तिची 'पाताल लोक' ही वेब सीरिज लोकांच्या पसंतीस पडली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची देखील निर्मिती केली होती. हा चित्रपट मागील वर्षी 24 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. लवकरच अनुष्का तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...