आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरचे वक्तव्य व्हायरल:जेव्हा करण म्हणाला होता - मी शाहरुखचा अजिबात चाहता नव्हतो, कारण तो ओव्हर अॅक्टिंग करतो असे मला वाटायचे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणचे हे वक्तव्य त्याच्या 'अ‍ॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रातील आहे.

शाहरुख खान मला अजिबात आवडत नव्हता, कारण तो ओव्हर अॅक्टिंग करतो, असे मला वाटायचे हे विधान आहे चित्रपट निर्माता करण जोहरचे. सध्या त्याचे हे विधान मीडियात व्हायरल होत आहे. करणचे हे वक्तव्य त्याच्या 'अ‍ॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रातील आहे. पूनम सक्सेनासोबत मिळून करणने आपले आत्मचरित्र लिहिले आहे.

'मी अजिबात त्याचा चाहता नव्हतो'
करणने पुस्तकात लिहिले, "शाहरुख 1999 मध्ये आला होता आणि मी त्याचा अजिबात चाहता नव्हतो. परंतु, तो अपूर्व मेहता (करणचा मित्र आणि आता धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ) आवडता होता. मी आमिरच्या टीममध्ये होतो आणि तो शाहरुखच्या टीममध्ये होता. एकीकडे अनेक तरुणी होत्या, ज्यांना शाहरुखचे वेड लागले होते आणि दुसरीकडे माझ्यासारखे काही होते, जे आमिरसाठी वेडे होते."

मला 'दीवाना' आवडला नव्हता
करण म्हणाला, "मी शाहरुख खानचा चाहता नव्हतो, कारण मला वाटायचं की तो ओव्हर अॅक्टिंग करतो. मला त्याचा 'दीवाना' (पदार्पणातील चित्रपट) आवडत नव्हता आणि अपूर्व म्हणायचा की आमिर कंटाळवाणा आहे. आमिर आणि शाहरुख यांच्यावरुन आमच्यात कायम भांडण व्हायचे.'

'करण- अर्जुन'च्या सेटवर पहिली भेट

करण जोहरच्या म्हणण्यानुसार, करण अर्जुन या चित्रपटाच्या सेटवर त्याची आणि शाहरुखची पहिली भेट झाली होती. त्याने आपल्या ऑटोबायोग्राफीत लिहिल्यानुसार, त्याचे वडील यश जोहर यांना 'डुप्लिकेट' या चित्रपटासाठी शाहरुखला साइन करायचे होते. जेव्हा ते 'करण-अर्जुन'च्या सेटवर शाहरुखला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी करणलाही बरोबर घेतले होते. करणच्या म्हणण्यानुसार तो यावेळी खूप घाबरला होचा आणि काजोलला (त्यावेळी ती 'जाती हूं मैं' या गाण्याचे शूटिंग करत होती) तू सेटवर आहे का?, असे विचारले होते.

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले
करण जोहरने 1998 मध्ये शाहरुख खान स्टारर 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. याशिवाय शाहरुखने करणच्या दिग्दर्शनाखाली 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना', 'माय नेम इज खान'मध्ये काम केले आहे.

शाहरुख आणि करणने पहिल्यांदा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मध्ये एकत्र काम केले होते, हा दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्राचा पहिला चित्रपट होता. या सिनेमात करणने शाहरुखचा मित्र रॉकीची भूमिका केली होती.

बातम्या आणखी आहेत...