आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायक केके (कृष्ण कुमार कुन्नाथ) यांनी 1991 मध्ये त्यांची बालपणीची मैत्रीण ज्योती लक्ष्मी कृष्णाशी लग्न केले होते. केके यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, लग्नाच्या वेळी ते बेरोजगार होते आणि ज्योतीशी लग्न करण्यासाठी सेल्समन म्हणून त्यांनी नोकरी केली होती.
लेडीलव्हशी लग्न करण्यासाठी केली होती सेल्समनची नोकरी
'द कपिल शर्मा शो'मध्ये केके यांनी सांगितले होते की, ज्योतीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्समन म्हणून नोकरी सुरु केली होती. कारण त्यांच्या सासरची इच्छा होती की, केके यांनी आधी नोकरी करावी, मगच त्यांचे ज्योतीशी लग्न होऊ शकेल. केके यांनी या शोमध्ये पुढे सांगितले होते की, 'मी ती नोकरी फक्त 3 महिने केली होती, त्यानंतर कंटाळून ती नोकरी सोडली होती.' केके यांना त्यांच्या पत्नीची साथ मिळाली आणि त्यांनी संगीत क्षेत्रात आपले करिअर घडवले.
केके यांनी आयुष्यात फक्त एकाच मुलीला डेट केले
केके पुढे म्हणाले होते, "मी माझ्या आयुष्यात फक्त एका मुलीला डेट केले आहे आणि ती म्हणजे माझी पत्नी ज्योती. मी तिला सहाव्या वर्गात भेटलो. मी खूप लाजाळू मुलगा होतो आणि ज्योतीला चांगल्या प्रकारे डेटही करू शकत नव्हतो. कधीकधी माझी मुलं मला याबद्दल खूप चिडवतात," असे त्यांनी सांगितले होते.
1999 मध्ये करिअरला केली होती सुरुवात
केके यांचा पहिला अल्बम 'पल' 1999 मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली. केके आपल्या करिअरसाठी दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाले. येथे आल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील बड्या गायकांच्या यादीत सामील झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ हिंदीच नव्हे तर तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी केके यांनी सुमारे 35,000 जिंगल्स गायल्या होत्या.
या वृत्ताशी संबंधित आणखी बातम्या येथे वाचा -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.